Tuesday, September 29, 2026

Lalbaugcha Raja : 'लालबागच्या राजा'च्या चरणी ₹6.11 कोटींचे दान; सोन्या-चांदीसह 2 बाईकचा होणार लिलाव

Lalbaugcha Raja : 'लालबागच्या राजा'च्या चरणी ₹6.11 कोटींचे दान; सोन्या-चांदीसह 2 बाईकचा होणार लिलाव

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 93 व्या गणेशोत्सवात भक्तांनी मोठ्या श्रद्धेने दान अर्पण केले. 14 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2026 या कालावधीत लालबागच्या राजाच्या चरणी एकूण ₹6,11,96,500 इतके दान जमा झाले. (Lalbaugcha Raja)

मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये स्टेज पेटीत ₹3,53,42,000, रंग पेटीत ₹2,42,40,000, तर विसर्जन पेटीत ₹16,14,500 इतकी रक्कम जमा झाली. या तिन्ही पेट्यांमधील रक्कम मिळून एकूण दान ₹6 कोटी 11 लाख 96 हजार 500 इतके झाले आहे.

दरम्यान, गणेशोत्सव पार पडल्यानंतर लालबागच्या राजाला भक्तांनी अर्पण केलेल्या वस्तूंचा जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला आहे. बुधवार, 30 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत लालबाग मार्केट येथे हा लिलाव होणार आहे.(Lalbaugcha Raja)

या लिलावात भाविकांनी लालबागच्या राजाला अर्पण केलेले सोन्या-चांदीचे दागिने, विविध साहित्य आणि इतर वस्तूंसह 2 बाईक लिलावासाठी ठेवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, या लिलाव प्रक्रियेत सर्व गणेशभक्तांना सहभागी होता येणार आहे.(Lalbaugcha Raja)

मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मानद सचिव सुधीर साळवी आणि खजिनदार मंगेश दळवी यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर आता लालबाग मार्केटमध्ये होणाऱ्या या जाहीर लिलावाकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.(Lalbaugcha Raja)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >