Dhule Crime : धुळ्यात २० हजारांची लाच घेताना तलाठ्यासह दोघे रंगेहात जाळ्यात, रेती वाहतुकीची परवानगी देण्यासाठी मागितली होती रक्कम

Dhule Crime : रेती वाहतुकीस परवानगी देण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठ्यासह दोन खासगी इसमांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. मंगळवारी धुळे शहरातील गांधी पुतळा परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.



तलाठ्यासह दोन खासगी इसम ताब्यात


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, मोहित बाबासाहेब वारे (३९) हे ग्राम महसूल अधिकारी (सजा कुसुंबा) आहेत.त्यांच्याकडे कौठाळ (ता. धुळे ) येथील अतिरिक्त कार्यभार आहे. याशिवाय प्रदीप विश्वास पाटील (रा. कौठाळ, ता. धुळे) आणि स्वप्निल रामकृष्ण देसले (रा. वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे) या दोन खासगी इसमांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.



प्रत्येक वाहनासाठी २५ हजारांची मागणी


तक्रारदार बांधकाम साहित्य वाहतुकीचा व्यवसाय करतात. त्यांच्या दोन मालवाहू वाहनांमधून पांझरा नदीपात्रातून रेती वाहतूक करून अमळनेर येथे नेण्यात येत होती.दरम्यान, सुमारे दीड महिन्यापूर्वी प्रदीप पाटील याने तक्रारदाराची भेट घेऊन आपण तलाठी मोहित वारे यांचे काम पाहत असल्याचे सांगितले. रेती वाहतूक सुरू ठेवायची असल्यास तलाठ्यांशी बोलावे लागेल, अन्यथा वाहनांवर कारवाई होऊ शकते, असे सांगून पैशांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी मोहाडी फाटा, कौठाळ येथे प्रदीप पाटील याने तक्रारदाराची भेट घेतली. तलाठी मोहित वारे यांचा निरोप असल्याचे सांगत पांझरा नदीपात्रातून रेती वाहतूक करण्यासाठी प्रत्येक वाहनामागे २५ हजार रुपये देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे.



तडजोडीनंतर २० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले


या प्रकारानंतर तक्रारदाराने २८ सप्टेंबर रोजी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता तलाठी मोहित वारे यांनी २५ हजार रुपयांची मागणी केल्यानंतर तडजोडीतून २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले. तसेच प्रदीप पाटील याने लाचेची मागणी करण्यासाठी मध्यस्थी केल्याचेही तपासात समोर आले.



गांधी पुतळा परिसरात एसीबीचा सापळा


तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. गांधी पुतळा परिसरात तक्रारदाराकडून तलाठी मोहित वारे यांनी २० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर ही रक्कम खासगी इसम स्वप्निल देसले याच्याकडे देण्यात आली. देसले याने रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तलाठी मोहित वारे, प्रदीप पाटील आणि स्वप्निल देसले या तिघांना ताब्यात घेतले.



सुवर्णा हांडोरे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई


ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा हांडोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस हवालदार संदीप हांडगे आणि पोलीस अंमलदार सुरेश चव्हाण यांचा समावेश होता. या कारवाईचे पर्यवेक्षण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकचे वाचक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी केले. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadanvis : ‘ट्रिगर’मध्ये न बसलेल्या तालुक्यांतही पीक नुकसानीनुसार मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

‘ग्राउंड ट्रूथिंग’द्वारे प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करणार मुंबई : दुष्काळाच्या मदतीसाठी ‘ट्रिगर-१’च्या निकषात

Sarathi Sanstha: ‘सारथी’ला 122 कोटी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला 150 कोटी

मुंबई: मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा आणि वसतिगृहांची उभारणी करण्यासाठी छत्रपती शाहू

Ketan Agrawal Murder Case : 'केतननं माझ्यासाठी काय गिफ्ट आणलंय?'... मृत्यूनंतर सियाचा मेसेज; आरोपपत्रात मोठा खुलासा

केतनच्या पाठीवर 'सिया' नावाचं टॅटू अन् मोबाईलमधील 'ते' फोटो!   पुणे : लोणावळा येथील केतन अग्रवाल हत्या

अफगाण टी20 लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना नो-एन्ट्री; नेमकं कारण काय? जाणून घ्या

आयपीएल टी20 लीग स्पर्धेच्या प्रचंड यशानंतर जगभरात विविध लीग स्पर्धा सुरू झाल्या आहेत. आता या लीग स्पर्धेत

Goregaon Film City: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी फिल्मसिटीची जागा ताब्यात, मुंबई महापालिका किती भाडं देणार?

मुंबई: गोरेगाव - मुलुंड लिंक रोड (GMLR) दुहेरी बोगद्याच्या प्रकल्पामुळे फिल्म सिटीमध्ये अडथळा निर्माण होताना

Shalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास वेगाने ! 40 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची 10 पथके तैनात

Nashik : बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास आता अधिक व्यापक करण्यात आला असून, नाशिक शहर पोलिसांच्या विशेष तपास