WorldSkills 2026 : जागतिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका; 1 रौप्यपदकासह 3 उत्कृष्टता पुरस्कार

मुंबई : चीनमधील शांघाय येथे झालेल्या ‘वर्ल्डस्किल्स शांघाय 2026’ या जागतिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राच्या युवा कौशल्यवंतांनी भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली. महाराष्ट्राच्या 5 स्पर्धकांनी विविध कौशल्य प्रकारांमध्ये चमक दाखवत 1 रौप्यपदक आणि 3 ‘मेडलियन ऑफ एक्सलन्स’ पटकावले. (WorldSkills 2026)


22 ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान झालेल्या या स्पर्धेत जगभरातील 68 देशांतील युवा कौशल्यवंतांनी 63 कौशल्य प्रकारांमध्ये सहभाग घेतला. भारताच्या संघातील महाराष्ट्राच्या प्रतिनिधींमध्ये कोविड गंग्राडे याने डिजिटल इंटरॲक्टिव्ह मीडिया प्रकारात रौप्यपदक पटकावले. तर खुशराज राठोड (आयटी नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशन), संपदा देसाई (केमिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी) आणि तहसीन सुतार (ब्युटी थेरपी) यांनी उत्कृष्टता पुरस्कार मिळवला.(WorldSkills 2026)


याशिवाय, ऑस्ट्रेलियात झालेल्या ‘ग्लोबल स्किल चॅलेंजेस 2026’ मध्ये महाराष्ट्राच्या हर्ष पवारने ‘थ्री-डी डिजिटल गेम आर्ट’ प्रकारात रौप्यपदक पटकावले.


prahaar.in/2026/09/29/india-shines-on-day-10-of-the-asian-games-gulveer-singh-completes-a-medal-hat-trick-relay-and-high-jump-bronze/



विजेत्यांना रोख पारितोषिके


या कामगिरीची दखल घेत राज्य शासनाने विजेत्यांसाठी रोख पारितोषिके जाहीर केली आहेत. रौप्यपदक विजेते कोविड गंग्राडे आणि हर्ष पवार यांना प्रत्येकी ₹3 लाख, तर उत्कृष्टता पुरस्कार मिळवणाऱ्या खुशराज राठोड, संपदा देसाई आणि तहसीन सुतार यांना प्रत्येकी ₹1 लाख मिळणार आहेत.(WorldSkills 2026)


राज्याच्या धोरणानुसार जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदकासाठी ₹5 लाख, रौप्यपदकासाठी ₹3 लाख, कांस्यपदकासाठी ₹2 लाख आणि उत्कृष्टता पुरस्कारासाठी ₹1 लाखांचे पारितोषिक दिले जाते.(WorldSkills 2026)


या यशाबद्दल कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, CII, DVET आणि विविध सेक्टर स्किल कौन्सिलच्या सहकार्यामुळे या स्पर्धकांना प्रशिक्षण, प्रवास, निवास आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.(WorldSkills 2026)

Comments
Add Comment

एशियन गेम्समध्ये दहाव्या दिवशी भारताचा गोल्डन धमाका; गुलवीर सिंहची मेडल हॅटट्रिक, रिले-हाय जम्पमध्ये कांस्य

जापानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स 2026 स्पर्धेचा दहावा दिवस भारतासाठी खास ठरला. भारताच्या ॲथलीट्सनी एकामागून

चेन्नईचा मास्टरस्ट्रोक; आयपीएल फायनलमध्ये धोनीला बाद करणाऱ्या स्टारची CSK मध्ये एन्ट्री!

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी दहाही फ्रेंचायीझी आपल्या उणीवा दूर करून संघ बांधणीसाठी पुढाकार घेत आहेत. त्या दृष्टीने

आजवरचे सर्व विक्रम मोडले..! भारतीय गोलंदाजाची आयसीसी क्रमवारीत मोठी झेप, असा रचला इतिहास

भारतीय महिला संघाची स्टार फिरकीपटू श्री चरणी सध्या जबरदस्त फॉर्मात आहे.त्याचं फळंही तिला मिळताना दिसत आहे.

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या वेळापत्रकाची या तारखेला होणार घोषणा, जाणून घ्या

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचं यजमानपद तीन देशांकडे आहे. दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया हे देश यजमान आहेत.

Asian Games 2026 : “हे सुवर्णपदक मला माझ्या आईच्या गळ्यात घालायचे आहे!” : आशियाई स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या नीरू धांडाची भावूक प्रतिक्रिया

ऐची-नागोया : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा (Asian Games 2026) स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक ट्रॅप शूटिंग प्रकारात

अफगाण टी20 लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना नो-एन्ट्री; नेमकं कारण काय? जाणून घ्या

आयपीएल टी20 लीग स्पर्धेच्या प्रचंड यशानंतर जगभरात विविध लीग स्पर्धा सुरू झाल्या आहेत. आता या लीग स्पर्धेत