Rule Change : 1 ऑक्टोबरपासून बदलणार अनेक नियम; LPG पासून बँकिंगपर्यंत काय बदलणार?

ऑक्टोबर महिना सुरू होताच देशातील काही महत्त्वाच्या नियमांमध्ये आणि सेवांमध्ये बदल होणार आहेत. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या LPG सिलेंडरचे दर जाहीर करतात. त्यामुळे 1 ऑक्टोबर 2026 रोजी घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या दरात बदल होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईत सध्या 14 किलोच्या घरगुती LPG सिलेंडरची किंमत 941.50 रुपये आहे.


LPG सबसिडी मिळवण्यासाठी आधार बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन किंवा e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्यांनी यापूर्वी e-KYC केले आहे, त्यांना पुन्हा प्रक्रिया करण्याची गरज नाही. तसेच 1 ऑक्टोबरपासून LPG सिलेंडरच्या डिलिव्हरीसाठी OTP आधारित पद्धत लागू होणार आहे. सिलेंडर घेताना ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आलेला OTP डिलिव्हरी एजंटला द्यावा लागेल.



तेल कंपन्या महिन्याच्या सुरुवातीला विमान इंधन म्हणजेच ATF चे दरही जाहीर करतात. त्यामुळे त्याचा परिणाम विमान तिकिटांच्या किमतीवर होऊ शकतो. मुंबईत सध्या ATF चा दर 98,247 रुपये प्रति किलोलीटर आहे.


SBI ग्राहकांसाठीही काही शुल्कांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ATM व्यवहारांच्या मोफत मर्यादेनंतर अतिरिक्त शुल्क लागू होऊ शकते. FD संदर्भातील काही नियमांमध्येही 1 ऑक्टोबरपासून बदल होणार आहेत.


NRI कडून स्थावर मालमत्ता खरेदी करताना TDS प्रक्रियेतही बदल करण्यात येणार आहे. याशिवाय जन्म-मृत्यू नोंदणीमध्ये 21 दिवसांनंतर नोंदणी केल्यास विलंब शुल्क आणि काही प्रकरणांत प्रतिज्ञापत्राची आवश्यकता असू शकते.


दरम्यान, कच्चा माल महागल्यामुळे AC, TV आणि फ्रिजसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ऑक्टोबरमध्ये सण आणि इतर कारणांमुळे बँकांना अनेक दिवस सुट्ट्या असतील. त्यामुळे बँकेशी संबंधित कामे करण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Asian Games 2026 : भारत-श्रीलंका आमनेसामने; आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत रंगणार मोठा सामना

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात उपांत्य फेरीचा सामना

Vithya Ramraj : विथ्या रामराजचा ऐतिहासिक पराक्रम! पी. टी. उषा यांचा 42 वर्षांचा विक्रम मोडीत काढत जिंकले कांस्यपदक

भारताची अडथळा शर्यतपटू विथ्या रामराज हिने 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मोठी कामगिरी केली आहे. आयची-नागोया येथे

Monsoon Update : महाराष्ट्रात पावसाची ओढ कायम; राष्ट्रीय पातळीवर पर्जन्यमानात सुधारणा

राज्यात यंदाच्या मान्सूनमध्ये पावसाची तूट कायम असून 28 सप्टेंबरअखेरीस ही तूट 18 टक्क्यांवर पोहोचली आहे.

Indian Railways : दसरा-दिवाळीत घरवापसी सोपी! पुणे आणि हडपसरहून विदर्भ अन् उत्तर भारतासाठी विशेष रेल्वे गाड्या जाहीर

पुणे : आगामी दसरा, दिवाळी आणि छठपूजा या सणांच्या काळात प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन रेल्वे

Box Office Collection: सिद्धार्थ-तमन्नाच्या ‘द वन’ आणि नानीच्या ‘द पॅराडाईज’ चित्रपटाची कोट्यवधींची कमाई!

मुंबई: चित्रपटांच्या विश्वात सध्या बॉक्स ऑफिसवर सुगीचे दिन सुरू असून, प्रेक्षकांचा चित्रपत्रांना भरघोस

मालेगाव तालुक्यात खळबळ! आठवडे बाजारात भेळ भत्ता खाल्ल्याने तब्बल 140 जणांना विषबाधा; प्रशासनाचे चौकशीचे आदेश

मालेगाव : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे भरलेल्या आठवडे बाजारात विक्रीस असलेल्या भेळ