Umesh Patil : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरूच नाही; ‘ना औपचारिक, ना अनौपचारिक’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत कोणतीही औपचारिक किंवा अनौपचारिक चर्चा सुरू नसल्याचे पक्षाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा पवार यांच्या नियमित भेटींना राजकीय रंग देणाऱ्या बातम्यांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. पक्षाबाबत बातमी देण्यापूर्वी अधिकृत प्रवक्त्यांकडून खातरजमा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबत गेल्या आठवडाभरापासून माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर पक्षाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. विलिनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा सुरू नाही. ना औपचारिक, ना अनौपचारिक आणि ना आमच्या बाजूने, ना त्यांच्या बाजूने, असे त्यांनी स्पष्ट केले. तथाकथित सूत्रांच्या हवाल्याने खोटे नॅरेटिव्ह तयार करून स्वतःचा राजकीय अजेंडा पुढे रेटणाऱ्यांपासून माध्यमांनी सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.



सुनेत्रा पवार यांच्या नियमित भेटींना राजकीय रंग देऊ नका


उमेश पाटील म्हणाले की, सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. त्या पुण्यात असताना पक्षाचे आमदार, पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते त्यांची भेट घेणे स्वाभाविक आहे. मतदारसंघातील विकासकामे, जिल्हा नियोजन समितीशी संबंधित विषय आणि मंत्रालयात प्रलंबित असलेली कामे यांसाठी आमदारांनी आपल्या नेतृत्वाची भेट घेणे अपेक्षितच आहे. मात्र, अशा नियमित भेटींनाही वेगळा राजकीय रंग देऊन ‘पार्थ पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली’ अशा बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. यामागे नेमका कोणाचा अजेंडा आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.



सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनीही चर्चा नसल्याचे सांगितले


खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनीही विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे आणि त्यासंदर्भात चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे उमेश पाटील यांनी नमूद केले. मग गेल्या आठवडाभरात विलिनीकरणाच्या बातम्या माध्यमांपर्यंत नेमक्या कोणी पोहोचवल्या? पक्षाकडून सुरुवातीपासून वस्तुस्थिती स्पष्ट केली जात असताना तथाकथित सूत्रांच्या माहितीवर विश्वास ठेवणे हा पक्षावर अन्याय नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.



माध्यमांनी अधिकृत प्रवक्त्यांकडून खातरजमा करावी


काही मंडळी स्वतःचा छुपा राजकीय अजेंडा आणि वैयक्तिक राजकीय हितसंबंध साधण्यासाठी माध्यमांचा वापर करत आहेत का, याचा शोध माध्यमांनी घ्यावा, असे पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात कोणतीही बातमी प्रसारित करण्यापूर्वी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते किंवा प्रमुख नेत्यांकडून वस्तुस्थितीची खातरजमा करावी. माध्यमांची विश्वासार्हता हीच पत्रकारितेची खरी ताकद असून, ती कोणाच्याही छुप्या राजकीय अजेंड्यासाठी पणाला लागू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


“सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं!” असे म्हणत उमेश पाटील यांनी विलिनीकरणाच्या चर्चांबाबत पक्षाची भूमिका पुन्हा स्पष्ट केली.

Comments
Add Comment

Mumbai Local Mega Block:  15 नोव्हेंबरला लोकलचा मेगा ब्लॉक; ठाणे-कल्याणसह पनवेल-वाशी मार्गावर वाहतुकीत बदल

Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी दिनांक 15 नोव्हेंबर

मुंबईत शिवशस्त्र शौर्यगाथेचा ऐतिहासिक ठेवा! वाघनखे, तलवारी पाहण्याची संधी; पुढील 6 महिने प्रदर्शन खुले

[caption id="attachment_1074960" align="aligncenter" width="800"] मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ या विशेष

Apple oxidation process : सफरचंद कापल्यावर काही वेळात काळं पडतं? रंग बदलू नये म्हणून काय करावं?

Apple oxidation process : सफरचंद हे फळ अतिशय आरोग्यदायी आहे. घरात कोणी आजारी असेल किंवा कोणत्या आजारी व्यक्तीला बघायला जातो

अहिल्यानगरमध्ये दीपावलीच्या रात्री 21 ठिकाणी आगीच्या घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे टळल्या दुर्घटना

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणानिमित्त अहिल्यानगर शहरात सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण असतानाच,

ACB trap Maharashtra news : समाजकल्याण निरीक्षक लाच घेताना जेरबंद; संत रोहिदास विकास केंद्राच्या प्रलंबित बिलासाठी मागितली ७५ हजारांची लाच

अहिल्यानगर : सरकारी काम पूर्ण करूनही त्याचे प्रलंबित बिल मिळवण्यासाठी ठेकेदाराला लाच द्यावी लागत असल्याचा

Diljit Dosanjh Ahmedabad Concert 2026: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये ‘ही’ 4 गाणी वाजणार नाहीत? बाल संरक्षण अधिकाऱ्यांचे पत्र

Diljit Dosanjh Ahmedabad Concert 2026: पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या 21 नोव्हेंबर 2026 रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाईव्ह