Eknath Shinde vs Rahul Gandhi: रोज नवा 'फेक नॅरेटिव्ह' रचायचा, हाच गांधी यांचा 'फुल-टाइम' उद्योग, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरमरीत टीका

राहुल गांधी यांना सध्या 'मोदी फोबिया'ने इतके पछाडले आहे, त्यांना उठता-बसता, जागता-झोपता फक्त नरेंद्र मोदीजीच दिसतात. स्वतःची बुडती नाव वाचवण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी 'फोन टॅपिंग'सारखे निराधार, कपोलकल्पित आणि बालिश आरोप करुन राहुल गांधी स्वत:चेच हसे करुन घेत आहेत, अशी खरमरीत टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.

मुंबई: राहुल गांधी यांना सध्या 'मोदी फोबिया'ने इतके पछाडले आहे, त्यांना उठता-बसता, जागता-झोपता फक्त नरेंद्र मोदीजीच दिसतात. स्वतःची बुडती नाव वाचवण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी 'फोन टॅपिंग'सारखे निराधार, कपोलकल्पित आणि बालिश आरोप करुन राहुल गांधी स्वत:चेच हसे करुन घेत आहेत, अशी खरमरीत टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.


खिशात पुरावे असल्याच्या पोकळ बाता मारायच्या, हवेत तीर सोडायचे आणि रोज नवा 'फेक नॅरेटिव्ह' रचायचा, हाच गांधी यांचा 'फुल-टाइम' उद्योग झालाय, असा टोलाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फोन टॅपिंग केल्याचा आरोप केला. त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गांधी यांच्यावर एक्स पोस्टमधून टीका केली.



उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक्स पोस्ट


उथळ पाण्याला खळखळाट फार... राहुल गांधी यांना सध्या 'मोदी फोबिया'ने इतके पछाडले आहे. त्यांना उठता-बसता, जागता-झोपता फक्त नरेंद्र मोदीजीच दिसतात. सत्य हेच आहे की, जोपर्यंत ते पंतप्रधानांचे नाव घेत नाहीत, तोपर्यंत त्यांची बातमीही होत नाही आणि माध्यमांच्या चर्चेतही ते टिकू शकत नाहीत. स्वतःची बुडती नाव वाचवण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आता ते 'फोन टॅपिंग'सारखे निराधार, कपोलकल्पित आणि बालिश आरोप करत आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


ना कोणता ठोस मुद्दा, ना विकासाचे व्हिजन, ना दाव्यांच्या पुष्ट्यर्थ एकही पुरावा! फक्त खिशात पुरावे असल्याच्या पोकळ बाता मारायच्या, हवेत तीर सोडायचे आणि रोज नवा 'फेक नॅरेटिव्ह' रचायचा, हाच त्यांचा आता 'फुल-टाइम' उद्योग झाला आहे. एकीकडे देश पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली प्रगतीचे नवे शिखर गाठत असताना, दुसरीकडे विरोधी पक्षनेते मात्र अशा हास्यास्पद विधानांनी स्वतःचेच हसे करून घेत आहेत. ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ ही म्हण आज त्यांच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरते, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Comments
Add Comment

अहिल्यानगरमध्ये दीपावलीच्या रात्री 21 ठिकाणी आगीच्या घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे टळल्या दुर्घटना

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणानिमित्त अहिल्यानगर शहरात सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण असतानाच,

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकने 15 वाहनांना उडवले, सुदैवाने जीवित हानी नाही

Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील समुद्धी महामार्गावर दुसरबीड टोल प्लाजा परिसराजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. समृद्धी

Maharashtra ST : एसटीच्या 13,980 पदांच्या कंत्राटी भरतीत फसवणूक झाल्यास कठोर कारवाई; खासगी संस्थांची चौकशी होणार

Mumbai News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) लवकरच सुमारे 13,980 चालक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात ! ट्रकने खासगी बसला 200 मीटर फरफटत नेले अन्... 38 प्रवासी जखमी

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. लांजा तालुक्यातील अंजणारी पुलावर शुक्रवारी (दि. 13

Maharashtra : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! 2.96 लाख विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; 1.88 कोटी रुपये परत

मुंबई : राज्यातील दुष्काळाचा फटका शेतकऱ्यांसोबतच विद्यार्थ्यांनाही बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने

'एसआयआर'मध्ये नोटीस बजावलेले ९९.९४ टक्के मतदार पात्र

मुंबई : विशेष मतदारपडताळणी मोहिमेअंतर्गत (एसआयआर) नोटीस बजावण्यात आलेल्या राज्यातील १ कोटी २२ लाख २४ हजार ७