Anamika Mishra: वय अवघं 7 वर्ष; लक्ष्य 30 किलोमीटर! अनामिकाच्या धाडसी आव्हानाची चर्चा

नवी दिल्ली: 'मुर्ती लहान पण किर्ती महान' ही म्हण आपण ऐकली असेल. या म्हणीचा प्रत्यय सहसा आपल्याला लवकर येत नाही. पण या म्हणीचा प्रत्यय उत्तर प्रदेशातील एका 7 वर्षीय मुलीबद्दल आला आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील अनामिका मिश्रा वयाच्या 7 व्या वर्षी 30 किलोमीटर शर्यत पूर्ण करण्याचं लक्ष गाठणार आहे. येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी अनामिका हे लक्ष गाठणार आहे. विकास खंड इटियाथोकच्या भीखमपुरवातील प्राथमिक विद्यालयामध्ये अनामिका दुसऱ्या इयत्तेत शिक्षण घेतेय. तिने गांधी जयंतीच्या दिवशी घेतलेल्या अनोख्या लक्षाची सध्या उत्तर प्रदेशमध्ये जोरदार चर्चा होत आहे.



7 वर्षीय, अनामिकाने 2 ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी, तिच्या शाळेपासून गोंडा येथील गांधी पार्कपर्यंत 30 किलोमीटरची शर्यत पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे. अनामिकाचे वडील आणि शाळेचे मुख्याध्यापक, मनोज कुमार मिश्रा म्हणाले की, माझ्या मुलीने गेल्या वर्षीच तिची प्रतिभा सिद्ध केली आहे. गेल्या वर्षी, तिने आठ मिनिटांत 240 पुश-अप्स पूर्ण करून 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्वत:चं नाव नोंदवलं होतं. त्यानंतर, तिने गांधी जयंतीच्या दिवशी, हातात तिरंगा घेऊन अवघ्या एका तासात 10 किलोमीटर धावून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्यानंतर ती पुन्हा एकदा महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी स्वत:च्या नावावर रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहे.



अनामिका 30 किमीची दौड 2 तास 45 मिनिटांमध्ये पूर्ण करणार आहे. सकाळी सहा वाजेपासून अनामिकेच्या शाळेपासून दौडला सुरूवात होणार आहे. अनामिकाचे वडील मनोज कुमार यांनी सांगितले की, "अनामिका गेल्या अनेक महिन्यांपासून 30 किलोमीटरच्या रनिंगची तयारी करत आहे. गेल्या 15 दिवसांपासून ती हातात तिरंगा घेऊन गावाभोवती 30 किलोमीटर धावण्याचा सराव करत आहे. आता 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी शक्य तितक्या कमी वेळेत 30 किलोमीटरची शर्यत पूर्ण करण्याचे तिचे ध्येय आहे." आठ मिनिटांत 240 पुश-अप्स पूर्ण करून अनामिकाने इंडिया बुकमध्ये स्वत:च्या नावाचा रेकॉर्ड केला होता. आता त्याचप्रमाणे यावेळी सुद्धा कोणता नवीन रेकॉर्ड ती स्वत:च्या नावावर करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Comments
Add Comment

Rabi MSP 2026 : रब्बी पिकांच्या MSP मध्ये मोठी वाढ; केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला अधिक लाभदायक भाव मिळावा आणि रब्बी हंगामातील पिकांच्या

Green Energy Corridor Phase 3 : १.८६ लाख कोटींच्या 'ग्रीन एनर्जी कॉरिडोअर-३' योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; १३५ गिगावॉट अक्षय ऊर्जेसाठी ग्रीड भक्कम होणार

नवी दिल्ली : भारतातील बिगर-जीवाश्म (Non-fossil) उर्जा क्षमतेचा झपाट्याने विस्तार करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने

Dubai- Tel Aviv Flight News: दुबई- तेल अवीव विमान हायजॅक नाहीच! तर विमानात भलतच घडलं; अखेर सत्य आलं समोर

नवी दिल्ली: दुबईहुन तेल अवीव विमानासंबंधित एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 'फ्लाय- दुबई' कंपनीच्या विमानामध्ये

Vande Bharat Train: देशातील दुसऱ्या 'वंदे भारत स्लीपर ट्रेन'ला मंजुरी, देशातील 'या' दोन प्रमुख शहरांदरम्यान धावणार हायस्पीड ट्रेन

नवी दिल्ली: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातल्या दुसऱ्या स्लीपर वंदे भारत ट्रेनला मंजुरी मिळाली

FlyDubai Flight : दुबईहून इस्राईलला जाणाऱ्या विमानाचं सौदी अरबमध्ये अचानक लँडिंग, त्या सिग्नलने उडाली खळबळ! नेमकं काय घडलं?

पश्चिम आशियातील युद्धाच्या भडकलेल्या ज्वालांमधेच एका आंतरराष्ट्रीय विमानाबाबत अत्यंत धक्कादायक घटना समोर

Terrorist Encounter : बडगाममध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी ठार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत लश्कर-ए-तोयबा (LeT) चा