नवी दिल्ली: दुबईहुन तेल अवीव विमानासंबंधित एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 'फ्लाय- दुबई' कंपनीच्या विमानामध्ये अचानक अपहरण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलीच खळबळ उडाली आहे. सौदी अरेबिया प्रांतामध्ये असताना विमानाने अचानक आपली दिशा बदलली, त्यामुळे सुरक्षा यंत्रणाची चांगलीच धावपळ उडाली. पण, या प्रकरणामध्ये आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घेऊया...
पश्चिम आशियातील युद्धाच्या भडकलेल्या ज्वालांमधेच एका आंतरराष्ट्रीय विमानाबाबत अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. संयुक्त अरब अमिरातीतील दुबई ...
'फ्लाय- दुबई' कंपनीच्या विमानामध्ये जे, दुबईवरून तेल अवीवला जात होते. विमानातील कॉकपिटमध्ये असलेल्या एका वैमानिकाला ते विमान क्रॅश करायच्या विचारात होता. पण दुसऱ्या वैमानिकाने त्याला तसं काही करू दिलं नाही. त्यानंतर त्या दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटीदरम्यान, विमान अपहरणाचा मेसेज एअर ट्रॅफिक कंट्रोलरला पाठवण्यात आला, ज्यामुळे इस्रायली सरकार सतर्क झाले. विमानातील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पायलटने प्लेन क्रेश करण्याचा प्रयत्न केला. पण, दुसऱ्या पायलटने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे दोघांमध्ये झटापट झाली. दुसऱ्या पायलटने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने पहिल्या पायलटला ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
नवी दिल्ली: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातल्या दुसऱ्या स्लीपर वंदे भारत ट्रेनला मंजुरी मिळाली आहे. ही हायस्पीड स्लीपर वंदे भारत ...
इस्रायली माध्यमांनुसार, या 'फ्लाय- दुबई' कंपनीच्या विमानामध्ये 24 मुलांसह एकूण 174 प्रवासी होते. इस्रायली माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कॉकपिटमध्ये असलेल्या दोन्ही वैमानिकांमध्ये जोरदार भांडण झाले होते. या वादाच्या भरात किंवा चुकीने वैमानिकाकडून "अपहरणाचा अर्थात इमर्जन्सी अलार्म" दाबला गेला. अपहरणाचा सिग्नल मिळताच आंतरराष्ट्रीय हवाई सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. विमान तात्काळ मॅन्युअल नियंत्रणाखाली आणण्यात आले. त्यानंतर विमान सौदी अरेबियाकडे वळवण्यात आले. काही वेळानंतर विमानासोबत संपर्क तुटला. बेन गुरियन विमानतळावर उतरण्याची परवानगी मिळवली होती, पण ती सुद्धा नाकारण्यात आली. वैमानिकांनी एटीसीच्या संदेशांना प्रतिसाद दिला नाही. यामुळे विमान अपहरणाची बातमी पसरली. सौदी अरेबियामध्ये विमान उतरल्यावर सर्व काही पूर्ववत झाले.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत लश्कर-ए-तोयबा (LeT) चा प्रमुख दहशतवादी मोहम्मद आसिफ उर्फ ...
एका इस्रायली महिलेने चॅनल 12 ला दिलेल्या माहितीनुसार, तिला कॉकपिटमधून किंकाळ्यांचा आवाज ऐकू आला. एका पायलटवर चाकूने हल्ला करण्यात आला होता. त्याच क्षणी, कॉकपिटमध्ये आरडाओरडा सुरू झाला. विमान अचानक खाली कोसळू लागले आणि लोक प्रार्थना करू लागले. 7500 आणि 7700 या क्रमांकांद्वारे एटीसीला मेसेज पाठवण्यात आला. आंतरराष्ट्रीय विमान प्राधिकरणाच्या नियमांनुसार, जेव्हा 7700 हा मेसेज विमानातून मिळतो, तेव्हा विमान आपत्कालीन स्थितीत आहे असे मानले जाते. त्याच वेळी, जर 7500 या क्रमांकावरून कोणताही सिग्नल आला, तर असे मानले जाते की कोणीतरी विमान हायजॅक केले आहे किंवा हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहे.



