पश्चिम आशियातील युद्धाच्या भडकलेल्या ज्वालांमधेच एका आंतरराष्ट्रीय विमानाबाबत अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. संयुक्त अरब अमिरातीतील दुबई शहरातून इस्रायलची राजधानी तेल अवीवच्या दिशेने उड्डाण भरलेल्या 'फ्लाईदुबई' (flydubai) कंपनीच्या एका प्रवासी विमानाबाबत सौदी अरेबियाच्या आकाशात अचानक संशयास्पद घडामोडी घडल्या. हे विमान सौदीच्या हवाई हद्दीतून प्रवास करत असताना वैमानिकाने आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक यंत्रणेला अत्यंत आणीबाणीचा मानला जाणारा 'स्क्वॉक कोड ७७००' पाठवला. मात्र, घडामोडी इथेच थांबल्या नाहीत; या संकेतानंतर काहीच वेळात विमानावरून 'कोड ७५००' प्रसारित करण्यात आला, जो जागतिक नियमांनुसार विमानाचे अपहरण किंवा विमानावर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न दर्शवतो.
मुंबई : राज्यातील अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी तसेच परिस्थितीवर नियंत्रण ...
या गंभीर सूचनेमुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा आणि हवाई वाहतूक नियंत्रण कक्षामध्ये प्रचंड खळबळ उडाली. विमानाची सुरक्षितता धोक्यात आल्याचे लक्षात येताच सौदी अरेबियाच्या हद्दीत या विमानाचे तातडीने लँडिंग करण्यात आले आहे. पश्चिम आशियामध्ये आधीच तणावाचे आणि युद्धाचे ढग दाटलेले असताना घडलेल्या या घटनेमुळे संभाव्य अपहरणाचा संशय व्यक्त केला जात असून, विमानातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत सुरक्षा यंत्रणांकडून वेगाने तपास सुरू आहे.






