नवी दिल्ली : भारतीय नेमबाज नीरू धांडाने 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली आहे. जपानमधील आयची-नागोया येथे झालेल्या ट्रॅप मिक्स्ड प्रकारात नीरूने कायनान चेनाईसोबत खेळताना सुवर्णपदक पटकावले. भारतीय जोडीने अंतिम फेरीत 34 गुण मिळवत अव्वल स्थान मिळवले.
या स्पर्धेत कतारच्या जोडीने 32 गुणांसह रौप्यपदक मिळवले, तर चीनला 23 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय जोडीने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत सुरुवातीपासूनच आपले स्थान मजबूत ठेवले.
भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाजी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघाने चीनचा पराभव करत ...
भारताने पहिल्या मालिकेत 6 गुण मिळवले. त्यानंतर दुसऱ्या मालिकेत एकूण गुणसंख्या 16 वर पोहोचली. तिसऱ्या मालिकेनंतर भारताच्या खात्यात 26 गुण जमा झाले. अखेर चौथ्या मालिकेत दमदार कामगिरी करत भारतीय जोडीने 34 गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले.
Asian Games 2026 | Indian pair Neeru and Kynan Chenai win the gold medal with an Asian Record of 34 out of 40 shots in the final of Trap Mixed Team shooting event This is India's first-ever gold medal in Trap Mixed Team event. pic.twitter.com/TP1dGru8l5
— ANI (@ANI) September 30, 2026
नीरू धांडासाठी या आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे तिसरे पदक ठरले आहे. यापूर्वी तिने महिलांच्या ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्यपदक मिळवले होते. त्यानंतर वैयक्तिक ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकत तिने विशेष कामगिरी केली होती. ट्रॅप शूटिंगमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली.
आता ट्रॅप मिक्स्ड प्रकारातील सुवर्णपदकामुळे नीरूच्या पदकांची संख्या आणखी वाढली आहे. तिच्या खात्यात वैयक्तिक प्रकारातील सुवर्णपदक, सांघिक प्रकारातील रौप्यपदक आणि मिश्र सांघिक प्रकारातील सुवर्णपदक जमा झाले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील नीरूच्या या कामगिरीमुळे भारतील नेमबाजी संघाच्या पदकसंख्तेतही भर पडली असूनस तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे क्रीडाविश्वात कौतुक होत आहे.





