वनडे मालिकेतील दुसरा सामना वेस्ट इंडिजसाठी करो या मरोची लढाई आहे. या सामन्यात पराभव झाला तर मालिका गमवावी लागेल. त्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिज संघ सर्वस्वी पणाला लावेल यात काही शंका नाही. दुसरीकडे, ग्रीव्हसच्या जागी प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी मिळेल याची उत्सुकता आहे. असं असताना वेस्ट इंडिज संघाकडे शेर्फेन रदरफोर्डचा पर्याय आहे. त्याला दुसऱ्या वनडे सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या वनडे सामन्यात त्याला संधी मिळाली नव्हती. रदरफोर्ड मधळ्या फळीत फलंदाजी करतो. ग्रीव्ह्सच्या अनुपस्थितीमुळे वेस्ट इंडिज संघाला मोठा धक्का असून त्यांच्या सलामीच्या जोडीत बदल करावा लागणार आहे. गुवाहाटीत जॉन कॅम्पबेलसोबत केसी कार्टी ओपनिंगला येऊ शकतो.
भारतीय संघाच्या निवड समिती अध्यक्षपदावर गेल्या काही वर्षांपासून अजित आगरकर होते. आता त्यांच्या कार्यकाळ संपुष्टात आला, अशी चर्चा सोशल मीडियावर ...
गुवाहाटी येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्याला तर जस्टीन ग्रीव्ह्स मुकणार आहेच, पण 3 ऑक्टोबर रोजी न्यू चंदीगड येथे होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यातही तो खेळू शकेल की नाही, याबाबत साशंकता आहे.
वेस्ट इंडिजची अशी आहे प्लेइंग 11: जॉन कॅम्पबेल, केसी कार्टी, शाई होप (कर्णधार), अमीर जांगू, शेर्फेन रदरफोर्ड, रॉस्टन चेस, कीमो पॉल, अल्झारी जोसेफ, शमर जोसेफ, जेडन सील्स, विटेल लॉज