Asian Games 2026 : भारत फायनलमध्ये! दक्षिण कोरियाचा 2-0 ने पराभव; सुवर्णपदकापासून एक पाऊल दूर

नागोया (जपान) : भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा 2-0 ने पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाने आपली उत्कृष्ट कामगिरी कायम राखत सुवर्णपदकाचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. आता 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत भारतासमोर चीनचे आव्हान असेल, ज्यामुळे 44 वर्षांची सुवर्णपदकाची प्रतीक्षा संपवण्याची भारताकडे सुवर्णसंधी आहे.(Indian Women Hockey Final)



संघाची दमदार कामगिरी आणि गोलरचना


उपांत्य फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच मजबूत बचाव केला. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये दोन्ही बाजूंना गोल करण्यात अपयश आले आणि पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत संपला. भारताला पहिल्या क्वार्टरमध्ये तब्बल नऊ पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु कोरियाच्या भक्कम बचावामुळे त्याचे गोलमध्ये रूपांतर करणे भारताला जमले नाही.


तथापि, तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आक्रमक पवित्रा घेत सामन्याची दिशा बदलली. 44 व्या मिनिटाला फॉरवर्ड खेळाडू इशिकाने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये सुंदर रूपांतर करून भारताला 1-0 अशी बहुमूल्य आघाडी मिळवून दिली. या धक्क्यातून दक्षिण कोरिया सावरण्यापूर्वीच, अवघ्या चार मिनिटांनंतर 48 व्या मिनिटाला सुनेलिता टोपोने एका शानदार मैदानी गोल करत भारताची आघाडी 2-0 अशी दुप्पट केली. कोरियाला सामन्यात पुनरागमन करण्यासाठी अखेरपर्यंत संघर्ष करावा लागला, पण त्यांना एकही गोल नोंदवता आला नाही.



ऐतिहासिक सुवर्णपदकाची प्रतीक्षा संपवण्याची संधी


या विजयासह भारतीय महिला संघाने फायनलचे तिकीट पक्के केले असून आता संपूर्ण देशाचे लक्ष 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या चीनविरुद्धच्या महामुकाबल्यावर लागले आहे. मागील अनेक दशकांपासून आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याचे भारतीय महिलांचे स्वप्न या विजयाने प्रत्यक्षात उतरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.(Indian Women Hockey Final)

Comments
Add Comment

IND vs WI: दुसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजचा विक्रमी खेळ, आतापर्यंत कधीच असं घडलं नाही; वाचा काय केलं ते

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक

Asian Games 2026 : सुवर्णपदक विजेता रुमेश आणि भारतीय भालाफेकपटूंनी जिंकली मने; जर्सींची केली अदलाबदल

Japan :आयची-नागोया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या भालाफेकपटूंनी दमदार कामगिरी करत देशाचे नाव

आश्चर्यकारक निर्णय..! 38 वर्षीय उमेश यादवला शुभमन गिलच्या टीमने दिली संधी

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवचं नशिब 38व्या वर्षी फळफळलं आहे. कारण त्याने या वयात नव्या संघाकडून खेळण्याची

John Campbell: रक्त न दिल्याने लादण्यात आली होती चार वर्षांची बंदी, आता जॉन कॅम्पबेलने ठोकलं शतक

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात दुसरा वनडे सामना गुवाहाटीत सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने

एशियन गेम्स 2026 स्पर्धेचा 11वा दिवस भारताचा, आर्चरी आणि शूटिंगमध्ये सुवर्णवेध; तर बॉक्सिंगमध्ये बसणार गोल्डन पंच

नागोया : 2026 च्या आशियाई खेळांच्या 11व्या दिवशी भारताच्या खेळाडूंनी अभूतपूर्व कामगिरी करत क्रीडा जगतात भारताचा

Asian Games 2026 : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! महिला तीरंदाजी संघ अन् नीरू-कीननचे सुवर्णपदक; PM मोदींकडून कौतुक!

नवी दिल्ली : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई खेळ २०२६ (Asian Games 2026) स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी विजयाची मालिका कायम ठेवत