Asian Games 2026 : भारताची मान उंचावली! आशियाई क्रीडा स्पर्धेत कंपाऊंड तिरंदाजी संघाने जिंकले 'गोल्ड'

भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाजी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघाने चीनचा पराभव करत देशाच्या पदकतालिकेत आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली. चिखिता थानिप्रथी, प्रीतिका प्रदीप आणि ज्योती सुरेखा वेन्नम या त्रिकुटाने अचूक नेमबाजी करत अंतिम सामन्यात दमदार कामगिरी केली.

भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाजी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघाने चीनचा पराभव करत देशाच्या पदकतालिकेत आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली. चिखिता थानिप्रथी, प्रीतिका प्रदीप आणि ज्योती सुरेखा वेन्नम या त्रिकुटाने अचूक नेमबाजी करत अंतिम सामन्यात दमदार कामगिरी केली.


अंतिम सामन्याच्या सुरुवातीला चीनने 10 गुणांसह चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर दोन 9 गुण मिळाल्याने त्यांच्यावर दबाव वाढला. भारताने याचा फायदा घेत सलग तीन 10 गुण मिळवत सामन्यात आपली पकड मजबूत केली. चीनने त्यानंतर तीन 10 गुण मिळवत जोरदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय खेळाडूंनीही अचूक नेम साधत त्याला प्रत्युत्तर दिले.


भारतीय संघाने सलग तीन परिपूर्ण 10 गुण मिळवत विश्वविक्रमाची बरोबरी केली आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यातील या कामगिरीमुळे भारतीय खेळाडूंच्या अचूकतेचे आणि दबावाच्या परिस्थितीत दाखवलेल्या संयमाचे कौतुक होत आहे.





तत्पूर्वी, उपांत्य फेरीत भारताचा सामना दक्षिण कोरियाशी झाला. हा सामना शेवटपर्यंत चुरशीचा राहिला. भारतीय खेळाडू चिखिता थानिप्रथी, प्रीतिका प्रदीप आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांनी दबाव असतानाही उत्तम कामगिरी केली.


दक्षिण कोरियाने भारतीय संघाला कडवी झुंज दिली. मात्र चिखिताचे पुनरागमन, प्रीतिकाची अचूक नेमबाजी आणि अनुभवी ज्योती सुरेखा वेन्नमच्या अखेरच्या फटक्यांमुळे भारताने 234-233 असा रोमांचक विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.


उपांत्य फेरीतील या विजयाचा आत्मविश्वास अंतिम सामन्यातही भारतीय संघाने कायम ठेवला. तिन्ही खेळाडूंच्या अचूक नेमबाजीच्या जोरावर भारताने चीनला मागे टाकत सुवर्णपदकावर कब्जा केला. या कामगिरीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तिरंदाजीच्या यशात आणखी एका महत्त्वाच्या अध्यायाची भर पडली.




थ्रिलर मॅचमध्ये भारताचा विजय! मिक्स्ड कंपाऊंड तीरंदाजीत दक्षिण कोरियाला नमवलं




भारताने आर्चरीमधील मिक्स्ड कंपाऊंड टीम इव्हेंटच्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा रोमहर्षक शूट-ऑफमध्ये पराभव करत एशियन गेम्स 2026 मध्ये आपले आठवे सुवर्णपदक जिंकले. दोन्ही संघांचा स्कोअर 157-157 असा बरोबरीत होता, ज्यामुळे सामन्याचा निर्णय शूट-ऑफद्वारे घेण्यात आला. भारतीय जोडीने अप्रतिम संयम दाखवत शूट-ऑफ 10-9 अशा फरकाने आपल्या नावावर केला आणि अंतिम सामना 158-157 अशा एकूण स्कोअरने जिंकून सुवर्णपदक नावावर केले. भारताच्या साहिल राजेश जाधव आणि चिकिता तनिपर्थी या जोडीने अचूक वेध घेत देशाला हा बहुमान मिळवून दिला.

Comments
Add Comment

ENG vs AUS ODI : इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर 135 धावांनी दणदणीत विजय; दुसऱ्या वनडेत मालिकेत 1-1 अशी बरोबरी

ॲडलेड : टॉम बँटनचे शानदार शतक आणि गस ॲटकिन्सनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात

U19 Asia Cup 2026 : शेवटच्या चेंडूवर पाकिस्तान OUT; गौतम गंभीरची पोस्ट चर्चेत

Gautam Gambhir Viral Post : भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या अंडर-19 आशिया कप 2026 च्या (U19 Asia Cup 2026) अत्यंत रोमांचक आणि

वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, न्युझीलंड विरुद्धची मालिका जिंकूनही 'या' चुकांवर दुर्लक्ष केलं तर...

मुंबई: न्युझीलंडमधील बे ओव्हल या होम ग्राऊंडमध्ये आज, न्युझीलंड विरुद्ध भारत हा सामना रंगला. ह्या शेवटच्या

न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात मोहम्मद सिराज इशान किशनवर भडकला; झेल सुटताच मैदानातच उडाली खळबळ!

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एका रोमांचक सामन्यादरम्यान मैदानात हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला

49 वर्ष उलटली तरीही सचिन तेंडुलकरने जपून ठेवली 'ती' एक गोष्ट! फोटो शेअर करत फॅन्सला केलं थकित

मुंबई: 'मास्टर ब्लास्टर' आणि 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. क्रिकेट

India vs New Zealand: टीम इंडियाचा थरारक विजय! न्यूझीलंडला 22 धावांनी नमवत वनडे मालिका जिंकली

भारत : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेचा शेवट अत्यंत रोमांचक झाला आहे. मालिकेतील