Gujarat ATS : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करीचा मोठा कट उधळला; 526 किलो ड्रग्जसह 5 पाकिस्तानी अटकेत

मुंबई : भारतीय तटरक्षक दलाने अरबी समुद्रात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. गुजरात दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) सहकार्याने करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे 526 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. या कारवाईत एका संशयित इराणी जहाजाला अडवण्यात आले असून, त्यावरील 5 पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.


ही कारवाई 25 सप्टेंबर रोजी लक्षद्वीपच्या पश्चिमेला अरबी समुद्रात करण्यात आली. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात ATS ला समुद्रमार्गे अमली पदार्थांची मोठी खेप नेली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सागरी तसेच हवाई पाळत वाढवण्यात आली. संशयित जहाजाच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याचा पाठलाग करण्यात आला.


विश्वसनीय माहितीच्या आधारे तटरक्षक दलाने संशयित जहाजाला अडवले. त्यानंतर सुरक्षा पथकाने जहाजावर जाऊन तपासणी केली. या तपासणीदरम्यान हेरॉईन आणि मेथॅम्फेटामाईनसह सुमारे 526 किलो प्रतिबंधित अमली पदार्थ आढळून आले. त्यानंतर हा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला.


जहाजावर असलेल्या 5 पाकिस्तानी नागरिकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. तटरक्षक दलाने संशयित जहाज, त्यातील कर्मचारी आणि जप्त केलेले अमली पदार्थ मुंबईत आणले आहेत. आता या प्रकरणाचा विविध तपास यंत्रणांकडून संयुक्त तपास केला जाणार आहे. त्यानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.


समुद्रमार्गे होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीला या कारवाईमुळे मोठा धक्का बसला आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या माहितीनुसार, सागरी भागात अवैध हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. समुद्र आणि हवाई पाळतीच्या माध्यमातून संशयास्पद हालचालींची माहिती घेतली जात असून, अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी कारवाई सुरू आहे.


Comments
Add Comment

Arunachal Pradesh Terror Attack : अरुणाचल प्रदेशात भारत-म्यानमार सीमेवर मोठा दहशतवादी हल्ला; आसाम रायफल्सचा एक जवान हुतात्मा, ४ जण गंभीर जखमी

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील चांगलांग जिल्ह्यात भारत-म्यानमार सीमेवर गस्त घालणाऱ्या आसाम रायफल्सच्या पथकावर

Supreme Court News: 18 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाचे नियम कडक होणार! सुप्रीम कोर्टाने नेमकं काय सांगितलं?

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या वापरावर कठोर

Central Employees DA Hike: याच आठवड्यात घोषणा? किती वाढणार DA?

केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींसोबतच महागाई भत्ता (DA) आणि महागाई

Chirag Paswan : "प्रियंका गांधी कशा जिंकल्या ? केरळ-हिमाचलमध्ये तुमचे सरकार कसे आले ?"; निवडणूक आयोगाच्या मुद्यावर चिराग पासवान यांचा काँग्रेसवर हल्लाबोल!

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणावर पूर्ण समाधान

Punjab News : ‘हॉस्टेलमध्ये आत्मा फिरतोय’ची अफवा; पंजाबमधील चितकारा विद्यापीठात शेकडो विद्यार्थ्यांचा गोंधळ, प्रशासनाने काय सांगितलं?

Punjab News : पंजाबमधील पटियाला येथील चितकारा विद्यापीठात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका कथित ‘भूता’च्या

IIT Bombay student suicide : IIT बॉम्बेमधील विद्यार्थ्याच्या आत्महत्येला नवे वळण; मैत्रिणीला केलेल्या अखेरच्या फोनमध्ये समोर आले धक्कादायक कारण!

मुंबई : आयआयटी बॉम्बेमधील (IIT Bombay) विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणात क्राइम ब्रांचच्या