मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या ‘पादचारी प्रथम’ अभियानाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी सर्व संबंधित यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार मुंबईतील पादचाऱ्यांना अडथळामुक्त, सुरक्षित व सलग पदपथ उपलब्ध करून देण्यासाठी पदपथांवरील अनधिकृत अतिक्रमणे व बांधकामे हटविण्याची मोहीम सुरू आहे. या अभियान अंतर्गत आर (मध्य) विभागातील बोरिवली (पश्चिम) परिसरात 20 अनधिकृत बांधकामे आणि 15 अनधिकृत स्टॉल्सवर 29 सप्टेंबर 2026 रोजी कारवाई करण्यात आली.
सुट्टीच्या काळात प्रवाशांसाठी खूशखबर! मध्य रेल्वेकडून मुंबई - मडगांव आणि मुंबई - नागपूर दरम्यान 8 विशेष गाड्यांची घोषणा
मुंबई : सणासुदीच्या आणि सुट्टीच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या ...
उपायुक्त (परिमंडळ 7) मनीष वळंजु यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (आर मध्य विभाग) डॉ. प्रफुल तांबे यांच्या नेतृत्वात संबंधित अधिकारी-कर्मचारी व कामगारांच्या पथकाने ही कारवाई केली. बोरिवली पश्चिम येथील लोकमान्य टिळक रोड, मार्केट लेन आणि बोरिवली सबवे रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली. ‘पादचारी प्रथम’ अभियानाच्या पहिल्या टप्प्यात बोरिवली परिसरातील 6 पदपथांवरील एकूण सुमारे 8 किलोमीटर परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
Navi Mumbai News: नवी मुंबईमध्ये साथीच्या आजारांचा कहर, शहरात डेंग्यू-मलेरियाचे किती रूग्ण? आकडेवारी जाहीर
नवी मुंबई: नवी मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबईतील तळोजा परिसरामध्ये डेंग्यु आणि मलेरियाच्या रूग्णांची ...
या कारवाईमुळे बोरिवली पश्चिम रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या नागरिकांना तसेच परिसरातील पादचाऱ्यांना अडथळामुक्त व अधिक मोकळे पदपथ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या कारवाईसाठी मुंबई महानगरपालिकेकडून 2 जेसीबी, 5 डंपर, 10 हून अधिक अधिकारी-कर्मचारी आणि 20 कामगार तैनात करण्यात आले होते. तसेच कारवाईदरम्यान आवश्यक पोलीस बंदोबस्तासाठी 15 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.