रोहित शर्माचा वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना दणका, शतकी खेळीसह वर्ल्डकपसाठी ठोकला दावा

वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेल्या 405 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माचा झंझावात पाहायला मिळाला. रोहित शर्मा वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर तुटून पडला. तसेच वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी आपला दावाही ठोकला.

वेस्ट इंडिजने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला 405 धावांचं मोठं आव्हान दिलं आहे. या धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांना आक्रमक सुरूवात करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्मा कशी सुरूवात करतात याकडे लक्ष लागून होतं. मागच्या सामन्यात शुभमन गिलने शतक ठोकलं होतं.पण रोहित शर्मा 32 धावा करून बाद झाला होता. त्यामुळे या सामन्यात रोहित शर्माकडून फार अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा रोहित शर्माने खऱ्या करून दाखवल्या. विजयी धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. समोर जो गोलंदाज येईल त्याला दणका दिला. रोहित शर्माने अर्धशतकी खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले.रोहित शर्माने अवघ्या 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर रोहित शर्माचा झंझावात हा सुरूच होता.  रोहित शर्माने 72 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 100 धावा पूर्ण केल्या. यावेळी त्याने 138.89 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

रोहित शर्माचा षटकारांचा विक्रम


वनडे क्रिकेटमध्ये एखाद्या विशिष्ट संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताचा 'हिटमॅन' रोहित शर्मा कमालीचा रेकॉर्ड आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तब्बल 93 षटकार ठोकून पहिल्या स्थानावर आहे. आता वेस्ट इंडिजविरुद्धही त्याने आतापर्यंत 40हून अधिक मारून आपला दबदबा निर्माण केला आहे. ख्रिस गेल इंग्लंडविरुद्ध 85, शाहिद आफ्रिदी श्रीलंकेविरुद्ध 63, सनथ जयसूर्या पाकिस्तानविरुद्ध 53, शाहिद आफ्रिदी भारताविरुद्ध 51, शाहिद आफ्रिदी न्यूझीलंडविरुद्ध 50, शाहिद आफ्रिदी झिम्बाब्वेविरुद्ध 47 आणि रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध 41 षटकार मारले आहेत.





रोहित शर्माने गाठला 12 हजारांचा पल्ला


भारताचा 'हिटमॅन' रोहित शर्माने 282 डावांमध्ये 12 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यासह त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकत जगातील दुसरा सर्वात जलद फलंदाज बनण्याचा बहुमान मिळवला आहे. या विक्रमी शर्यतीत भारताचा 'किंग' विराट कोहलीने अवघ्या 242 डावात हा पल्ला गाठला आहे. सचिन तेंडुलकर 300 डावांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. 12 हजार धावांच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी रोहितने 12,973 चेंडूंचा सामना केला. या विक्रमातही 'किंग' विराट कोहली पहिल्या स्थानावर असून त्याने 18853 चेंडू खेळले होते.

                      
                  
Comments
Add Comment

ENG vs AUS ODI : इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर 135 धावांनी दणदणीत विजय; दुसऱ्या वनडेत मालिकेत 1-1 अशी बरोबरी

ॲडलेड : टॉम बँटनचे शानदार शतक आणि गस ॲटकिन्सनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात

U19 Asia Cup 2026 : शेवटच्या चेंडूवर पाकिस्तान OUT; गौतम गंभीरची पोस्ट चर्चेत

Gautam Gambhir Viral Post : भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या अंडर-19 आशिया कप 2026 च्या (U19 Asia Cup 2026) अत्यंत रोमांचक आणि

वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, न्युझीलंड विरुद्धची मालिका जिंकूनही 'या' चुकांवर दुर्लक्ष केलं तर...

मुंबई: न्युझीलंडमधील बे ओव्हल या होम ग्राऊंडमध्ये आज, न्युझीलंड विरुद्ध भारत हा सामना रंगला. ह्या शेवटच्या

न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात मोहम्मद सिराज इशान किशनवर भडकला; झेल सुटताच मैदानातच उडाली खळबळ!

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एका रोमांचक सामन्यादरम्यान मैदानात हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला

49 वर्ष उलटली तरीही सचिन तेंडुलकरने जपून ठेवली 'ती' एक गोष्ट! फोटो शेअर करत फॅन्सला केलं थकित

मुंबई: 'मास्टर ब्लास्टर' आणि 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. क्रिकेट

India vs New Zealand: टीम इंडियाचा थरारक विजय! न्यूझीलंडला 22 धावांनी नमवत वनडे मालिका जिंकली

भारत : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेचा शेवट अत्यंत रोमांचक झाला आहे. मालिकेतील