मुंबई (विशेष प्रतिनिधी): पवई तलावात मिसळणाऱ मलजलाच्या २० प्रवाहांना ‘इंटरसेप्ट’ करून ते भांडुप मलजल प्रक्रिया केंद्राकडे (एटीपी) वळविण्याचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. या कामांतर्गत एकूण 3 हजार 56 मीटर लांबीच्या नवीन मलनिस्सारण वाहिन्या अंथरण्यात आल्या असून, त्यामुळे 1 ऑक्टोबर 2026 पासून पवई तलावात मलजल मिसळण्यास पूर्णतः आळा बसेल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिली.या उपाययोजनांमुळे पवई तलावात मिसळणाऱ्या मलजलाचे प्रमाण नियंत्रित होऊन तलावाच्या जलप्रदूषणास आळा घालण्यास मोठी मदत होणार आहे.
Ganesh Idols Immersion: कृत्रिम तलावांमध्ये तब्बल 97 टक्के गणेश मूर्तींचे विसर्जन, मुंबई महानगरपालिकेचा दावा
मुुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईकर श्रीगणेशभक्त आणि श्रीगणेश मंडळांनी उदंड प्रतिसाद देत तब्बल 97.27 टक्के श्रीगणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन केले ...
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पवई तलाव परिसराचे नैसर्गिक जतन व पुनरुज्जीवन करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. तलाव प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढून त्याचे नैसर्गिक सौंदर्य व जैवविविधता अबाधित ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनामार्फत नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू आहेत. या अनुषंगाने, पवई तलावात येणाऱ्या मलजलाच्या प्रवाहास प्रतिबंध करणे तसेच मलजल प्रक्रिया केंद्रामार्फत मलजलावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे, ही प्रमुख कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत.
अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी बुधवारी 30 सप्टेंबर 2026 रोजी प्रकल्पस्थळास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.तसेच, कामांची सद्यस्थिती आणि पुढील कार्यवाहीचा आढावा घेतला. निर्धारित वेळेत आणि आवश्यक त्या गुणवत्तेच्या निकषांनुसार कामे पूर्ण करावीत, असे निर्देश बांगर यांनी दिले.
पवई तलाव हा सन 1891 मध्ये निर्माण करण्यात आला असून त्याचा संपूर्ण जलव्याप्त परिसर 223 हेक्टर इतका आहे. जवळपास 6.6 किलोमीटरचा परिघ असलेल्या पवई तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 600 हेक्टरवर पसरले असून तलावाची जलधारणा क्षमता ही सुमारे 5 हजार 455 दशलक्ष लीटर इतकी आहे. पवई तलावाचे पाणी हे पिण्याव्यतिरिक्त इतर प्रयोजनासाठी उपयोगात येते. पवई तलाव परिसरात वाढलेले नागरिकरण आणि तलावामध्ये दररोज येणारे सुमारे 18 दशलक्ष लीटर मलजल यामुळे जल प्रदूषण होत आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेच्या मलः निसारण प्रकल्प आणि मुंबई मलःनिसारण विल्हेवाट प्रकल्प या विभागांनी तलावात मलजल मिसळणा-या एकूण 20 विसर्ग बिंदूंची (आऊटफॉल) पाहणी केली. त्यापैकी 1 ते 18 विसर्ग बिंदू आदि शंकराचार्य मार्गावर तर 2 विसर्ग बिंदू तलावाच्या उत्तरे दिशेकडील पेरूगेट या ठिकाणी आहेत.
पवई तलावात येणाऱ्या मलजल प्रवाहास प्रतिबंध करण्यासाठी मलःनिस्सारण प्रकल्प विभागामार्फत 18 मलजल प्रवाह ‘इंटरसेप्ट’ करून ते गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून भांडुप मलजल प्रक्रिया केंद्राकडे वळविण्याचे काम 100 टक्के पूर्ण करण्यात आले आहे. या कामांतर्गत एकूण 3 हजार 56 मीटर लांबीच्या मलनिस्सारण वाहिन्या अंथरण्यात आल्या आहेत. मलजलाचा बिगरपावसाळी प्रवाह आदि शंकराचार्य मार्गावरील विद्यमान मलनिस्सारण वाहिनीद्वारे भांडुप येथील मलजल प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात आला असून, या कामानंतर खोदण्यात आलेल्या चरांचे पुनर्स्थापना करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच, पेरूगेट येथील दोन मलजल प्रवाह ‘इंटरसेप्ट’ करून ते फिल्टरपाडा मलजल प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात आले आहेत.
Mumbai News: बोरिवलीत अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई, अतिक्रमण विभागाने 20 बांधकामे आणि 15 स्टॉल्स केले निष्कासित
मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या ‘पादचारी प्रथम’ अभियानाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त ...
यासमवेतच, पवई येथील वापरात नसलेल्या मलजल उदंचन केंद्राच्या जागेवर 8 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या आधुनिक आणि पूर्णपणे स्वयंचलित मलजल प्रक्रिया केंद्राचे बांधकाम करण्यात येत आहे. मुंबई मलनि:सारण प्रकल्प यांच्यामार्फत मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्याची कार्यवाही सुरू आहे. या मलजल प्रक्रिया केंद्राद्वारे मलजलावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून 8 दशलक्ष लीटर शुद्ध पाणी पुन्हा तलावात सोडण्यात येणार आहे. निविदेनुसार काम पूर्णत्वाचा कालावधी डिसेंबर 2028 आहे. तथापि, मे २०२७ पर्यंत मलजल प्रक्रिया केंद्राचे काम पूर्ण करण्याचे महानगरपालिकेचे प्रयत्न आहेत. हे मलजल प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर 8 दशलक्ष लीटर मलजल या मलजल केंद्राकडे आणि उर्वरित 8 दशलक्ष लीटर मलजल भांडुप मलजल प्रक्रिया केंद्राकडे नेण्यात येणार आहे. या प्रसंगी उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (मलनि:सारण प्रकल्प) संजयकुमार पांडव, प्रमुख अभियंता (मुंबई मलनि:सारण प्रकल्प) राजेंद्र परब यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पवई तलावात मलजल मिसळत असल्यामुळे तलावाच्या पाण्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. पवई तलाव हा पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील परिसंस्था असल्याने त्याची जल गुणवत्ता अबाधित राखणे आणि तलावात मिसळणाऱ्या मलजलास प्रतिबंध करणे अत्यंत आवश्यक आहे. याच अनुषंगाने मलजल प्रवाहांना अडवून ते मलजल प्रक्रिया केंद्रांकडे वळविण्याची कार्यवाही करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे.