मैत्रिणींसोबत फिरवण्यासाठी दुचाकी चोरली; 3 तरुणांना अटक
छत्रपती संभाजीनगर : मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या 3 तरुणांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या 3 दुचाकी जप्त केल्या आहेत. संजय विनोद जाधवर, सुशांत मंगेश भालेराव आणि युवराज विष्णू चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.22 सप्टेंबर रोजी पोलिसांचे विशेष पथक पाम हॉटेल परिसरात गस्त घालत होते. यावेळी एका मोपेडवर 3 तरुण एकाच वेळी प्रवास करताना पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली. चौकशीत त्यांनी ही मोपेड क्रांती चौक परिसरातून चोरल्याची कबुली दिली.
मुंबई/पुणे : यावर्षी गांधी जयंती शुक्रवार, 2 ऑक्टोबर रोजी आल्यामुळे खवय्ये आणि प्रवाशांना सलग तीन दिवसांच्या लाँग वीकेंडचा आनंद घेण्याची सुवर्णसंधी ...
त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपींनी टाऊन सेंटर परिसरातून आणखी 2 दुचाकी चोरल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील तिन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकी चोरी करण्यासाठी आरोपी वेगळी चावी वापरत नव्हते. ते दुचाकीच्या हँडल लॉकवर पायाने जोरदार लाथ मारून ते तोडत होते. त्यानंतर वायर जोडून गाडी सुरू करून ते पसार होत होते.
चोरी केलेल्या दुचाकींचा वापर आरोपी मैत्रिणींना फिरवण्यासाठी आणि मौजमजेसाठी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून चोरीच्या अन्य घटनांमध्ये त्यांचा सहभाग आहे का, याबाबत तपास सुरू आहे.





