मुंबई : मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबागच्या रेवसदरम्यान बंद असलेली प्रवासी बोटसेवा 1 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पावसाळ्यात समुद्रातील परिस्थिती आणि बदलत्या हवामानामुळे ही सेवा काही महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आली होती. आता समुद्र आणि हवामान प्रवासी वाहतुकीसाठी अनुकूल झाल्याने जलमार्ग पुन्हा खुला करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुंबईहून अलिबाग आणि कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Mumbai Rewas Ferry)
Maharashtra Weather : महाराष्ट्रात परतीच्या मान्सूनला सुरुवात झाली असून राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला आहे. 1 ऑक्टोबर रोजी राज्यातील कोणत्याही ...
प्रवासी वाहतुक पुन्हा सुरु
दरवर्षी पावसाळ्याच्या काळात भाऊचा धक्का-रेवस मार्गावरील सेवा थांबवण्यात येते. याच काळात मोरा-भाऊचा धक्का आणि गेटवे ऑफ इंडिया-मांडवा या मार्गांवरील बोटसेवा आधीच टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली होती. मात्र, भाऊचा धक्का ते रेवस मार्गावर हवामानामुळे अधिक काळ खबरदारी घेण्यात आली. आता परिस्थिती सुधारल्यानंतर या मार्गावर पुन्हा प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. (Bhaucha Dhakka)
जाणून घ्या वेळापत्रक
मुंबई-रेवस बोट प्रवासासाठी प्रवाशांना 100 रुपये तिकीट द्यावे लागणार आहे. भाऊचा धक्का येथून पहिली बोट सकाळी 6.30 वाजता सुटणार आहे. त्यानंतर सकाळी 8, 10, दुपारी 12, 4 आणि 5 वाजता बोटी उपलब्ध असतील. मात्र, समुद्रातील परिस्थिती आणि हवामानानुसार वेळापत्रकात बदल होऊ शकतो, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Rewas Boat Service)
मुंबई-रेवस जलवाहतूक पुन्हा सुरू झाल्यामुळे रस्ते मार्गावरील प्रवाशांचा काही प्रमाणात वेळ वाचण्यास मदत होणार आहे. तसेच उरणमधील करंजा-रेवस जलमार्गावर येणारा अतिरिक्त प्रवासी भारही कमी होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात अलिबाग, रायगड आणि कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही बोटसेवा विशेष महत्त्वाची ठरणार आहे. (Ferry service)






