Thursday, October 1, 2026

LPG Cylinder Price: ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी कमर्शियल सिलेंडर महाग; घरगुती गॅसचे दर स्थिर

LPG Cylinder Price: ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी कमर्शियल सिलेंडर महाग; घरगुती गॅसचे दर स्थिर

LPG Cylinder Price:  ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच व्यावसायिक गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. तेल कंपन्यांनी 1 ऑक्टोबर 2026 पासून 19 किलोच्या कमर्शियल LPG सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. यावेळी सिलेंडरच्या किमतीत 62.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मात्र, घरगुती वापरासाठी असलेल्या 14.2 किलोच्या LPG सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

नव्या दरानुसार दिल्लीमध्ये 19 किलोचा कमर्शियल सिलेंडर आता 2810 रुपयांना मिळणार आहे. याआधी सप्टेंबर महिन्यातही या सिलेंडरच्या दरात 9.50 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर किंमत 2747.50 रुपयांवर पोहोचली होती. आता ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच पुन्हा दर वाढल्याने व्यावसायिक गॅस वापरणाऱ्या क्षेत्रांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

या दरवाढीचा थेट परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि कॅटरिंग व्यवसायांवर होण्याची शक्यता आहे. गॅसचा खर्च वाढल्याने खाद्यपदार्थांच्या किमतीतही बदल होऊ शकतो. त्यामुळे सणासुदीच्या काळात बाहेर खाण्याचा खर्च वाढण्याची शक्यता ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, घरगुती ग्राहकांना सध्या दिलासा मिळाला आहे. 14.2 किलोच्या सिलेंडरचे दर देशातील प्रमुख शहरांमध्ये पूर्वीप्रमाणेच आहेत. दिल्लीमध्ये घरगुती सिलेंडर 942 रुपये, मुंबईमध्ये 941.50 रुपये, कोलकात्यात 968 रुपये आणि चेन्नईमध्ये 957.50 रुपये आहे.

तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतात. त्यानुसार कमर्शियल सिलेंडरच्या दरात बदल करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या सिलेंडरच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आगामी काळात गॅसच्या दरांमध्ये आणखी बदल होणार का, याकडे व्यावसायिक आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >