फ्लायदुबईच्या FZ1073 या विमानात हवेतच घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. दुबईहून इस्रायलच्या दिशेने निघालेल्या या विमानाच्या कॉकपिटमध्ये कॅप्टन आणि सह-पायलटमध्ये वाद झाला. यावेळी सह-पायलटने भारतीय कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
हल्ल्यानंतर विमानाची उंची अचानक कमी होऊ लागली. काही वेळात विमान सुमारे 14,000 फूट खाली आल्याचे फ्लाइट ट्रॅकिंगमधून दिसून आले. त्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती गंभीर असतानाही जखमी अवस्थेतील कॅप्टन स्मित मच्छर यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला. यामुळे काही प्रवासी आणि क्रू सदस्यांना आत जाण्याची संधी मिळाली आणि त्यांनी सह-पायलटला रोखल्याचे सांगितले जात आहे.
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
यानंतर विमानातील इतर अनुभवी वैमानिकांनी विमानाचे नियंत्रण हाती घेतले. विमान सौदी अरेबियातील तबूक येथे सुरक्षितपणे उतरवण्यात आले. विमानात 170 हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी होते. या घटनेत मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात येत आहे.
A salute to Indian pilot Captain Smit Machchhar for his extraordinary bravery.
Despite being stabbed and seriously injured, he fought back, opened the cockpit door and helped passengers and crew overpower the attacker, preventing a catastrophic mid-air disaster and saving 174… https://t.co/RJc2vuthSv
— MyGovIndia (@mygovindia) September 30, 2026
कॅप्टन स्मित मच्छर यांना हल्ल्यात दुखापत झाली असून त्यांच्यावर तबूक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भारतीय दूतावास त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कॅप्टनच्या धाडसाचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी कौतुक केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पायलटला 'नायक' म्हटले. भारतीय अधिकाऱ्यांनीही कॅप्टनच्या धाडसाचे कौतुक केले आहे.
My salute to the Indian pilot Captain Smit Machchhar for his extraordinary bravery.
Despite being stabbed and seriously injured, he fought back, resisted, opened the cockpit door, and enabled passengers and crew to overpower the attacker — preventing a catastrophic mid-air…
— Benjamin Netanyahu - בנימין נתניהו (@netanyahu) September 30, 2026
-
दरम्यान, या घटनेची चौकशी सुरू असून सह-पायलटने नेमका हल्ला का केला, याचा तपास केला जात आहे. तपास पूर्ण होईपर्यंत इस्रायलला जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णय फ्लायदुबईने घेतला आहे.
कॅप्टन स्मित माछार कोण आहेत ?
कॅप्टन स्मित मच्छर हे मूळचे गुजराती भारतीय असून त्यांना व्यावसायिक विमान वाहतुकीचा दहा वर्षांहून अधिक अनुभव आहे. स्मित जून २०२२ मध्ये थेट प्रवेश कॅप्टन म्हणून फ्लायदुबईमध्ये रुजू झाले. यापूर्वी, त्यांनी जून २०११ ते २०२२ पर्यंत जवळपास ११ वर्षे स्पाईसजेटमध्ये काम केले. याचसोबत ते इतर वैमानिकांना मार्गदर्शनही केले आहे. त्यांनी वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून व्यवसाय प्रशासनाची पदवी मिळवली आहे.