MLA Prasad Lad: आमदार प्रसाद लाड यांनी स्वीकारला महिंद्रा अँड महिंद्रा वर्कर्स युनियनच्या सरचिटणीस पदाचा पदभार

मुंबई: कांदिवली येथील गेल्या ७० वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या मान्यताप्राप्त 'महिंद्रा अँड महिंद्रा वर्कर्स युनियन'च्या सरचिटणीसपदी आमदार प्रसाद लाड यांनी पदभार स्वीकारला आहे. युनियनच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत श्रमिक उत्कर्ष सभेच्या पॅनेलला कामगारांचा मोठा पाठिंबा मिळाला, त्यानंतर ही जबाबदारी आमदार लाड यांच्याकडे सोपवण्यात आली.


श्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष म्हणून आमदार प्रसाद लाड गेल्या काही वर्षांपासून कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. कामगारांचे प्रश्न प्रशासनाच्या पातळीवर मांडणे, संबंधित यंत्रणांशी संवाद साधणे आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे, या माध्यमातून त्यांनी कामगार क्षेत्रात आपली भूमिका अधिक सक्रिय केली आहे. BEST कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबतही त्यांनी विधान परिषदेसह विविध स्तरांवर पाठपुरावा केला असल्याचे वृत्तांत नोंदवले गेले आहे.






महिंद्रा अँड महिंद्रा वर्कर्स युनियनला दीर्घ आणि समृद्ध कामगार चळवळीची परंपरा लाभली आहे. अनेक ज्येष्ठ कामगार नेत्यांनी या संघटनेचे नेतृत्व केले आहे. अशा ऐतिहासिक संघटनेची जबाबदारी मिळणे हा माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठा विश्वास आणि जबाबदारी आहे, अशी भावना आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केली. “गेली पाच वर्षे श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न मार्गी लावताना कामगारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याच विश्वासाची ही जबाबदारी आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील हजारो कामगारांच्या हिताचे संरक्षण करतानाच कंपनीचा विकास आणि कामगारांचे कल्याण यांचा समतोल साधण्यासाठी आपण कटिबद्ध राहू. कामगारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करू,” असे आमदार लाड यांनी सांगितले.


महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या कांदिवली येथील कारखान्यात सुमारे ६ ते ६.५ हजार कामगारांना रोजगार मिळत असून, या कामगारांच्या रोजगाराची सुरक्षितता, कल्याणकारी सुविधा, सेवा-संबंधित प्रश्न आणि भविष्यातील संधी यासाठी युनियनच्या माध्यमातून सकारात्मक आणि रचनात्मक भूमिका घेण्याचा निर्धार आमदार लाड यांनी व्यक्त केला. यावेळी महिंद्रा अँड महिंद्रा वर्कर्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांसह श्रमिक उत्कर्ष सभेचे भालचंद्र साळवी, बाबा कदम, अध्यक्ष सुहास गोरे, रोहित केणी, महेश सावंत, श्रीकांत शेट्टी, संजय दरेकर, अमेय लाड, माणिक मोरे, देवेंद्र खैरे तसेच युनियनच्या कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कामगार सहकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

ब्रिटनचे प्रिन्स विलियम आणि त्यांची पत्नी प्रिंसेस केट मिडलटन यांच्या भारत दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल

मुंबई: ब्रिटनचे प्रिन्स विलियम (Prince William) आणि त्यांची पत्नी प्रिंसेस केट मिडलटन (Kate Middleton) हे पुढच्या तीन दिवसांसाठी

ठाणे जिल्ह्यातील कोतवाल भरती परीक्षेची तारीख बदलली; आता या दिवशी होणार परीक्षा, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील महसूल सेवक (कोतवाल) पदाच्या भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी

Mumbai Bomb Threat : CSMT रेल्वे स्थानक पुन्हा एकदा उडवून देण्याची धमकी; पोलिसांकडून कसून शोधमोहीम सुरू

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आल्याने

Mumbai 26/11 attack : मुंबईतील २६/११ च्या नरिमन हाऊसची रेकी केल्याप्रकरणी २० वर्षीय तरुणाला अटक

मुंबई : मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलेल्या कुलाबा येथील नरिमन हाऊससह शहरातील काही

BMC Revenue: महापालिकेच्या महसूलात तबबल 815 कोटींनी होणार वाढ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिकेचा महसूल वाढवण्याच्यादृष्टीकोनातून लिलाव पध्दतीने भूखंड भाडेकरारावर

Sion Hospital: महापालिकेच्या शीव रुग्णालयात अतिरिक्त ड्युअल एनर्जी सी.टी.स्कॅनची सुविधा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): रुग्णांच्या आजारांसाठी तसेच विविध रोगांचे निदान करण्यासाठी डयुअल एनर्जी सी.टी. स्कॅनचा