चिपच्या तुटवड्यामुळे मोबाईल फोन महाग; नवीन खरेदीऐवजी 'रिफर्बिश्ड' फोनकडे ग्राहकांचा कल

आजच्या आधुनिक युगात प्रत्येक जण हा मोबाईलचा वापर करत असतो. अगदी रस्त्यावर बसून सामान विकणाऱ्या सामान्यातल्या सामान्य माणसाकडे देखील मोबाईल असतो. आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन ही माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील गरज बनली आहे. प्रत्येक गोष्टीसाठी माणूस मोबाईलवर अवलंबून असल्याने फोनशिवाय लोकांचे पान हलत नाही, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु ऐन सणासुदीच्या काळात मोबाईल फोनच्या किंमती वाढल्याने सामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.


सणासुदीचे दिवस आले की मोबाईलचे दर कमी होतील या आशेने बहुतांश लोक या दिवसांत मोबाईल खरेदीचा विचार करतात. परंतु, यंदा मोबाईलच्या किंमती कमी होण्याऐवजी कैक पटीने वाढल्या असल्याचे चित्र समोर आले आहे. सणासुदीच्या दिवसांत ग्राहक ई-कॉमर्स साईट्सवरील डिस्काउंट ऑफर्स आणि स्थानिक दुकानांमधील खास 'सेल'ची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, यावेळी सणांच्या काळातही मोबाईल फोनचे भाव गगनाला भिडल्यामुळे बाजारातील ग्राहकांचा उत्साह मंदावला आहे. दुकानांमध्ये देखील नवीन फोन खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीचे प्रमाण घटले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.



इलेक्ट्रॉनिक चिप्सचा निर्माण झालेला तुटवडा हे या दरवाढीमागील सर्वांत मोठं कारण असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. जगभरातील मोठया तंत्रज्ञान कंपन्यांचा कल हा AI सर्व्हरच्या विकासाकडे असल्याने चिप उत्पादक कंपन्यांचा बहुतांश पुरवठा हा एआय क्षेत्राकडे वळवण्यात आला आहे. यामुळे मोबाईलसाठी लागणाऱ्या प्रोसेसरचा आणि इलेक्ट्रॉनिक चिप्सचा पुरवठा कमी झाला आहे. मात्र नवीन मोबाईल फोन महाग झाल्याचा फायदा हा 'रिफर्बिश्ड' म्हणजेच सेकंड-हँड मोबाईल बाजाराला होताना दिसत आहे. नवीन मोबाईल फोन्सच्या गगनाला भिडणाऱ्या किंमती पाहून बाजारात निम्म्या किंमतीला मिळणारे, चांगल्या स्थितीत असणारे आणि वॉरंटीसह येणारे सेकंडहॅन्ड मोबाईल घेण्याकडे ग्राहक पसंती दर्शवत आहेत. त्यामुळे सध्या बाजारात नवीन फोनची विक्री थंडावली असली तरी रिफर्बिश्ड फोनच्या बाजारात मात्र मोठी तेजी पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis Captain Smit : महाराष्ट्राचा सुपुत्र आणि खरा 'हिरो'! कॅप्टन स्मित यांच्या धैर्याचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

मुंबई :

Prahaar : उज्ज्वल निकम यांच्या ‘प्रहार’ सिनेमात दिसणार ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता, साकारली वकिलाची भूमिका

Prahaar : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी आणि त्यानंतरची कायदेशीर लढाई मांडणाऱ्या ‘प्रहार: द अनटोल्ड

'हे काही क्रिकेट नाही...', 406 धावांचा यशस्वी पाठलाग करूनही टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर नाखूश

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वनडे सामन्याची ऐतिहासिक नोंद झाली आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने 405 धावा

Nashik : सिंहस्थापूर्वी नाशिक पोलिसांची मोठी कारवाई ! झारखंडची टोळी जेरबंद, 3.32 लाखांचे मोबाईल जप्त

Nashik : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे.

Online Gambling : ऑनलाईन जुगाराच्या व्यसनापोटी डिलिव्हरी बॉय बनला सराईत गुन्हेगार; नवी मुंबई पोलिसांकडून नऊ गुन्हे उघडकीस

नवी मुंबई : ऑनलाईन जुगाराच्या (Online Gambling) व्यसनापायी पैशांची गरज भागवण्यासाठी एका 24 वर्षीय डिलिव्हरी बॉयने

'यंदा पावसाने दगा दिला'... एकनाथ शिंदेंच्या 'त्या' ट्विटने चिंता वाढली, जनतेला भावनिक आवाहन करत म्हणाले...

महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून आता रब्बी हंगामासमोरही संकट उभं राहिलं