एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत पाकिस्तान, सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा उडवला धुव्वा

एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढती पार पडल्या. पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि बांगलादेश, तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारत आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. भारताने श्रीलंकेला 124 धावांनी पराभूत केलं आणि अंतिम फेरी गाठली. तर पाकिस्तानने बांगलादेशचा 6 विकेट राखून धुव्वा उडवला आणि अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना अंतिम फेरीत भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. अंतिम फेरीचा सामना 3 ऑक्टोबर 2026, शनिवारी सकाळी 10 वाजता होणार आहे.



भारत श्रीलंका उपांत्य फेरीचा सामना


श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पूर्णपणे भारताच्या पथ्यावर पडला. भारताने 20 षटकात 7 गडी गमवून 169 धावा केल्या आणि विजयासाठी 170 दिल्या. या धावा काही श्रीलंकेला गाठता आल्या नाहीत. श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 45 धावांवर बाद झाला. भारताने या सामन्यात 124 धावांनी विजय मिळवला. या विजयाचा इशान किशनची खेळी महत्त्वाची ठरली. त्याने 46 चेंडूत 80 धावा केल्या. तर वैभव सूर्यवंशीने 21 चेंडूत 38 धावांची खेळी केली. जसप्रीत बुमराहने 2, अक्षर पटेलने 2, अभिषेक शर्माने 2 आणि वॉशिंग्टन सुंदरने 1 विकेट काढली.




दोन्ही संघांची प्लेइंग 11


श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): लसिथ क्रुसपुल्ले, सिनेथ जयवर्धने, सोहन डी लिवेरा (विकेटकीपर), अशेन बंडारा, सहान अरचिगे (कर्णधार), नुवानिडू फर्नांडो, चमिका करुणारत्ने, वानुजा सहान, विजयकांत व्यासकांत, थारिंडू रत्नायके, बिनुरा फर्नांडो.


भारत (प्लेइंग इलेव्हन): वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), इशान किशन, टिळक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह



पाकिस्तान बांगलादेश उपांत्य फेरी


एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि बांगलादेश हे संघ आमनेसामने आले होते. पावसाचा व्यत्यय आल्याने हा सामना 13 षटकांचा करण्यात आला होता. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करून 13 षटकात 7 गडी गमवून 111 धावा केल्या आणि विजयासाठी 113 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान पाकिस्तानने 11.3 षटकात 4 गडी गमवून गाठलं.




                  
Comments
Add Comment

W, W, W..! एशियन गेम्स स्पर्धेत अभिषेक शर्माने घेतल्या सलग तीन विकेट, पण हॅटट्रीक नाही; कारण...

एशियन गेम्स स्पर्धेच्या उपांत्या फेरीत भारत आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल

Asian Games 2026 : मनू आणि प्रिन्सची चमकदार कामगिरी; सेलिंग स्पर्धेत भारताला रौप्यपदक

 Asian Games 2026 : आशियाई खेळ 2026 च्या 13 व्या दिवशी भारताच्या खात्यात दोन पदकांची भर पडली आहे. महिलांच्या सांघिक स्क्वॅशमध्ये

Asian Games 2026 : 10 सुवर्णपदकांनंतरही भारताची चिंता कायम; आशियाई क्रीडा स्पर्धेत 28 गोल्डचा टप्पा अजूनही दूर

 Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांची कमाई सुरू आहे. 30 सप्टेंबर रोजी भारतीय खेळाडूंनी एकाच दिवसात 4

भारताचा ऐतिहासिक विजय, वेस्ट इंडिजविरुद्ध 406 धावांचं विजयी लक्ष्य गाठलं

भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. वेस्ट इंडिजने विजयासाठी 406 धावांच आव्हान ठेवलं होतं. हे

शुभमन गिलची बॅट पुन्हा चमकली! ODI मध्ये 200 धावा; पाठलाग करताना द्विशतक झळकावणारा पहिला आशियाई फलंदाज

नवी दिल्ली: संपूर्ण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण आला आहे. कर्णधार शुभमन गिलने आपल्या खेळीने

रोहित शर्माचा वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना दणका, शतकी खेळीसह वर्ल्डकपसाठी ठोकला दावा

वेस्ट इंडिजने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला 405 धावांचं मोठं आव्हान दिलं आहे. या धावांचा पाठलाग करताना भारतीय