Manori Ship Robbery : मनोरी समुद्रातील जहाजावर चोरीचा प्रयत्न अंगलट; विषारी वायूच्या गळतीमुळे चौघांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई : मुंबईतील मनोरी (Manori) आणि गोरई किनाऱ्याजवळ (Gorai) अडकून पडलेल्या एका परदेशी जहाजावर चोरीच्या उद्देशाने गेलेल्या चौघांचा विषारी वायूची गळती झाल्याने गुदमरून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना दोन ते तीन दिवसांपूर्वी घडली असून, पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरू केली आहे. वादळी वारे आणि जोरदार पावसामुळे हे परदेशी जहाज गेल्या चार महिन्यांपासून मनोरी समुद्रातील वाळूत रुतून बसले होते. दरम्यान, मागील महिन्याभरात काही टोळ्यांची या अडकलेल्या जहाजावर वाईट नजर होती आणि तिथून साहित्य चोरण्याचे प्रयत्न सुरू होते, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, दोन-तीन दिवसांपूर्वी आठ जणांची एक टोळी 'स्पीडबोट'च्या साह्याने या जहाजाजवळ पोहोचली. त्यातील एका साथीदाराने बोट सांभाळण्यासाठी खालीच थांबणे पसंत केले, तर उर्वरित सात जण चोरी करण्यासाठी जहाजावर चढले. जहाजावर चढल्यानंतर टोळीतील चार जण आतील बंदिस्त खोलीत शिरले. तेथे गॅस कटरच्या साह्याने गॅसची पाईपलाईन कापून चोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, पाईपलाईन कापताना अचानक आतमध्ये मोठ्या प्रमाणात विषारी वायूची गळती झाली. या दाट वायूमुळे चारही जणांचा श्वास गुदमरला आणि त्यांचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर घाबरलेल्या एका साथीदाराने थेट गोरई पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि जहाजावर आपले चार साथीदार अडकल्याची माहिती पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांना घटनेचे गांभीर्य लक्षात आले आणि त्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या.


पोलीस आणि मर्चंट नेव्हीच्या पथकाने संयुक्तपणे शोध व बचाव मोहीम हाती घेतली. बुधवारी हेलिकॉप्टरच्या मदतीने मदत पथकाने जहाजाच्या आत प्रवेश केला आणि चारही मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर हे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमाॉर्टम) स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मरण पावलेले चारही तरुण ३० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. त्यांची नावे व ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. तसेच भरसमुद्रात जाऊन अशा प्रकारे धाडसी चोऱ्या करण्यासाठी त्यांनी कोणत्या मार्गांचा वापर केला, याचाही शोध पोलीस घेत आहेत. या टोळीने यापूर्वीही दोनदा या जहाजावर दरोडा टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.


दुसरीकडे, या प्रकरणाच्या तपासात जहाजाच्या मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. संबंधित मालक सध्या परदेशात असून तो फरार आहे. तसेच, हे जहाज समुद्रात रुतण्यापूर्वी त्यावरून तेल विक्रीशी संबंधित काही बेकायदेशीर व्यवसाय चालत होते का, याचाही संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे. गोरई पोलिसांनी सध्या या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद (ADR) केली असून, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Central Railway : 'सेखों इंडियन एअरफोर्स मॅरेथॉन 2026'साठी मध्य रेल्वे धावणार; धावक आणि प्रवाशांसाठी 2 विशेष लोकल गाड्या जाहीर

मुंबई : भारतीय वायुदलाचे सुपुत्र आणि परमवीर चक्र विजेते फ्लाइंग ऑफिसर स्वर्गीय निर्मलजीत सिंह सेखों यांच्या

Devendra Fadnavis Captain Smit : महाराष्ट्राचा सुपुत्र आणि खरा 'हिरो'! कॅप्टन स्मित यांच्या धैर्याचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

मुंबई :

गांधी जयंतीची 3 दिवसांची सुट्टी… पण प्लॅन अजूनही नाही? 5 ठिकाणं, पटकन करा ट्रिप प्लॅन

मुंबई/पुणे : यावर्षी गांधी जयंती शुक्रवार, 2 ऑक्टोबर रोजी आल्यामुळे खवय्ये आणि प्रवाशांना सलग तीन दिवसांच्या लाँग

MLA Prasad Lad: आमदार प्रसाद लाड यांनी स्वीकारला महिंद्रा अँड महिंद्रा वर्कर्स युनियनच्या सरचिटणीस पदाचा पदभार

मुंबई: कांदिवली येथील गेल्या ७० वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या मान्यताप्राप्त 'महिंद्रा अँड महिंद्रा

Mumbai Rewas Ferry : मुंबई-रेवस बोटसेवा आजपासून पुन्हा सुरू; प्रवाशांना मोठा दिलासा, जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई : मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबागच्या रेवसदरम्यान बंद असलेली प्रवासी बोटसेवा 1 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू

Powai Lake: पवई तलावांत जाणारे सांडपाणी १०० टक्के बंद

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पवई तलावात मिसळणाऱ मलजलाच्या २० प्रवाहांना ‘इंटरसेप्ट’ करून ते भांडुप मलजल प्रक्रिया