Thursday, October 1, 2026

ODI WC 2026 Schedule: आयसीसी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान कोणत्या गटात?

ODI WC 2026 Schedule: आयसीसी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान कोणत्या गटात?

आयसीसी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. गेल्या काही दिवसांपाासून या स्पर्धेच्या वेळापत्रकाची चर्चा होती. अखेर आयसीसीने या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करून सस्पेन्स संपवला आहे. या स्पर्धेत एकूण 14 संघ भाग घेणार असून नव्या फॉर्मेटनुसार ही स्पर्धा होणार आहे. मुख्य स्पर्धेत एकूण 12 संघच असणार आहेत. तर बाराव्या संघासाठी 12, 13 आणि 14 व्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये सुपर सिरीज होणार आहे. तर ग्रुप स्टेजमध्ये 12 संघांची विभागणी दोन गटात होणार असून प्रत्येक गटात सहा संघ असतील. या गाटत एकूण 30 सामने होणार आहेत. या गटातून सुपर 7 स्टेजमध्ये 7 संघांची निवड होणार आहे. या सात संघात राउंड रॉबिन पद्धतीने सामने होतील. यात फेरीत टॉपला असलेल्या चार संघांना थेट उपांत्य फेरी खेळण्याची संधी मिळेल. पहिल्या क्रमांकावर असलेला संघ चौथ्या क्रमांकाशी, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेला संघ तिसऱ्या क्रमांकाच्या संघाशी उपांत्य फेरीची लढत करेल. या स्पर्धेत एकूण 57 सामने खेळले जाणार आहेत. 12 मैदानात या स्पर्धेचं आयोजन होणार आहे. दक्षिण अफ्रिकेतील 8, झिम्बाब्वेतील 3 आणि नामिबियातील एका मैदानात सामने खेळले जातील.

आयसीसी वनडे वर्ल्डकपसाठी पात्र ठरलेले संघ

आयसीसी वनडे क्रमवारीनुसार, भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ थेट पात्र ठरले आहेत. उर्वरित चार संघ पात्रता फेरीत खेळतील. वेस्ट इंडिज संघ 2027च्या वनडे विश्वचषकासाठी थेट पात्र ठरलेला नाही. पुढील वर्षीची स्पर्धा नव्या स्वरूपात होणार असून बाद फेरीपूर्वी तीन टप्पे असतील.अंतिम गट फेरीतील संघ निश्चित करण्यासाठी तीन संघांच्या सुपर सिरीजने 2 ऑक्टोबर 2027 रोजी विंडहोकमध्ये स्पर्धेला सुरुवात होईल. उर्वरित 12 संघांना प्रत्येकी सहा संघांच्या दोन गटांमध्ये विभागले असून, त्यातील सर्वोत्तम सात संघ सुपर 7 ​​टप्प्यात प्रवेश करतील. अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील आणि अंतिम सामना 21 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारताच्या गटात कोण?

स्पर्धेसाठी दोन गट तयार करण्यात आले आहेत. यात अ गटात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, झिम्बाब्वे हे संघ आहे. एक संघ पात्रता फेरीतून या गटात ठरेल. तर ब गटात बांगलादेश, इंग्लंड,दक्षिण अफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड हे संघ ठरले आहेत. तर एक संघ सुपर सिरीजमधून निश्चित होईल. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्याने क्रीडाप्रेमींना हायव्होल्टेज सामना पाहायला मिळेल. 10 ऑक्टोबर 2027ला भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा इतिहास

आयसीसीने 1975 मध्ये पहिल्यांदा वनडे वर्ल्डकप स्पर्धेची सुरुवात केली आणि तेव्हापासून ही स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जात आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेचे हे 14वं पर्व आहे. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा 2 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर 2027 दरम्यान खेळली जाईल. ही स्पर्धा संयुक्तपणे दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांमध्ये खेळवली जाणार आहे. दक्षिण अफ्रिकेत 24 वर्षानंतर वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने 2003 मध्ये वनडे वर्ल्डकप स्पर्धेचे यजमानपद भूषवले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >