छत्रपती संभाजीनगर येथून मन सुन्न करणारी घटना! प्रसुतीचा खर्च करण्यास नकार आणि गर्भवतीचा गेला बळी

छत्रपती संभाजी नगर येथून मन सुन्न करणारी आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. गर्भवती महिलेवर उपचार करण्यास उशीर झाल्याने महिलेचा आणि तिच्या पोटातील अभ्रकाचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर येथील पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे ही घटना घडली. स्वाती उर्फ समीक्षा विशाल निंबाळकर असं या मृत महिलेचं नाव असून सासरच्या मंडळींनी उपचारात अढमुठेपणा केल्याने तिला स्वतःचा आणि हे जग सुद्धा न बघितलेल्या आपल्या बाळाचा जीव गमवावा लागला.


६ सप्टेंबर रोजी नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या समीक्षाची प्रकृती खालावली. यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान तिची शारीरिक स्थिती चांगली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोटातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच बाळाची नाळ ही बाळाच्या गळ्याभोवती आवळली गेल्याने डॉक्टरांनी सीझर डिलेव्हरी करण्याचा सल्ला दिला. परंतु समीक्षाच्या सासरच्यांनी प्रसूतीसाठी लागणारा खर्च करण्यास नकार दिला. समीक्षासाठी तिचं माहेर धावून आलं. परंतु माहरेची माणसं खर्च करण्यास तयार असूनदेखील समीक्षाच्या सासू सासऱ्यांनी तिला रुग्णालयात दाखल होऊ दिले नाही. अधिक संतापजनक बाब म्हणजे, समीक्षाचा नवरा म्हणजेच विशालदेखील समीक्षाच्या बाजूने उभा राहिला नाही.



समीक्षाची तब्येत अधिकच बिघडत चालल्याने अखेर तिला २५ सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तपस सुरु होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सासरच्यांचा अढमुठेपणामुळे समीक्षाचा नाहक बळी गेला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी समीक्षाचा पती विशाल निंबाळकर, सासरे अनिल निंबाळकर, सासू शारदा आणि नणंद ऐश्वर्या निंबाळकर यांच्यावर पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. या प्रकरणामुळे निंबाळकर कुटुंबाचा निर्दयीपणा उघड झाला आहे. याआधी समीक्षाला सासरकडून मानसिक किंवा शारीरिक त्रास होतो आहे का? याची चौकशी पोलिस करणार आहेत.

Comments
Add Comment

आठ विद्यार्थ्यांचा दिवेआगारात बुडून मृत्यू, आळंदीतील विनर्स अकादमीचा परवाना रद्द; कारण काय?

११ वी आणि १२ वी इयत्तेत शिकत असलेल्या८ अल्पवयीन मुलांचा दिवेआगर येथे पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आळंदी

Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सप्तशृंग गडावर विशेष नियोजन ! गर्दी व्यवस्थापनासह वाहतूक, पार्किंग, आरोग्य आणि कचरा व्यवस्थापनाचा मास्टर प्लॅन

Simhastha Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात मोठ्या संख्येने भाविक

दृश्यम चित्रपटात नवा ट्वीस्ट, आता 2 ऑक्टोबर नाही तर 23 जुलै! सोशल मीडियावर तारखेचा नवा ट्रेंड

भारतीय चित्रपट इतिहासात थरारक सिनेमा म्हणून दृश्यमची ख्याती आहे. मल्याळम चित्रपटाच्या कथानकावर बॉलिवूडमध्ये

Nashik : नाशिककरांना मोठा दिलासा ! मालमत्ता नाव बदलाच्या विलंब शुल्कात मोठी कपात

Nashik : मालमत्ता हस्तांतरणानंतर महापालिकेच्या करनोंदींमध्ये नाव बदलण्यास विलंब झाल्यास आकारण्यात येणाऱ्या

Fodder crisis in Nashik : नाशिकमध्ये चारा संकटाचे सावट, दुष्काळामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर

Fodder crisis in Nashik : जिल्ह्यातील दहा तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता शेतीपिकांसोबतच पशुधनाच्या चाऱ्याचा

दादासाहेब फाळके चित्रनगरीचा आणखीन विस्तार होणार, सांस्कृतिक कार्य विभागाला जमीन देण्यास शासनाची मान्यता

मुंबई: फिल्म सिटीचा आता आणखीन विस्तार होणार आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीचा आणखीन विस्तार करण्यासाठी