Yuzvendra Chahal retirement: युझवेंद्र चहलची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती; भावनिक पोस्ट शेअर करत दिली चाहत्यांना माहिती

भारताचा स्टार लेग-स्पिनर युझवेंद्र चहल याने प्रथम श्रेणी (रेड-बॉल) क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतासाठी कसोटी सामना खेळण्याचे आणि 'टेस्ट कॅप' मिळवण्याचे त्याचे अनेक वर्षांचे स्वप्न अपूर्णच राहिले, परंतु मर्यादित षटकांच्या (वनडे आणि टी-२०) क्रिकेटमध्ये आपले योगदान देणे सुरूच ठेवणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.ऑगस्ट २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या T२० सामन्यात चहलने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. निवृत्तीची घोषणा जाहीर करताना युझवेंद्र चहलने एक भावनिक पोस्ट केली आहे.


सोशल मीडियावर आपली भावना व्यक्त करताना चहलने सांगितले की, 'वयाच्या १० व्या वर्षी त्याने पहिल्यांदा हातात लाल चेंडू धरला होता. या खेळाच्या प्रेमात मी इतका खोलवर पडणार आहे, याची मला तेव्हा अजिबात कल्पना नव्हती. माझ्यासाठी 'लाल चेंडूचे क्रिकेट' हा केवळ खेळाचा आणखी एक प्रकार नव्हता. याच खेळामुळे मला संयम, चारित्र्य आणि जिद्द यांचा अर्थ समजला; तसेच प्रत्येक धावेसाठी आणि प्रत्येक विकेटसाठी संघर्ष करत मैदानावर तासनतास उभे राहण्याचा निखळ आनंदही मला याच खेळातून मिळाला.'






पुढे चहल म्हणाला, 'मी माझा शेवटचा 'फर्स्ट-क्लास' सामना लॉर्ड्सवर खेळलो. हे शब्द उच्चारताना मला भावूक व्हायला होतं, कारण 'टेस्ट कॅप' मिळवणे हे माझं एक स्वप्न होतं आणि ते मी अनेक वर्षे उराशी बाळगलं होतं. कदाचित ते स्वप्न पूर्ण झालं नाही, पण माझ्या या प्रवासाबद्दल मी मनापासून समाधानी आहे आणि फॉर्मेटमध्ये मला मिळालेल्या प्रत्येक संधीबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे.' चहलने त्याच्या संपूर्ण प्रवासात सातत्याने पाठिंबा आणि विश्वास दिल्याबद्दल हरियाणा क्रिकेट असोसिएशन, तसेच रणबीर सिंग महिंद्रा आणि अनिरुद्ध सिंग चौधरी यांचे विशेष आभार मानले. प्रथम श्रेणी क्रिकेटला अलविदा करताना चहलने आपल्या चाहत्यांना आश्वस्त केले आहे की, भारतीय संघात पुनरागमन करण्याची त्याची इच्छा अजूनही कायम आहे.


 


प्रथम श्रेणी कारकिर्दीतील आकडेवारी




  • कारकिर्दीची सुरुवात: २००९ मध्ये हरियाणा संघातून पदार्पण.

  •  एकूण सामने: ४९ प्रथम श्रेणी सामने.

  •  एकूण बळी: १४८ विकेट्स (सरासरी ३२.२७).

  • उत्कृष्ट हंगाम: २०१६/१७ च्या रणजी ट्रॉफी हंगामात हरियाणाकडून खेळताना ७ सामन्यांत ३३ बळी घेतले.

  • शेवटची कामगिरी (इंग्लंड कौंटी): कौंटी चॅम्पियनशिपमध्ये नॉर्थम्प्टनशायर (Northamptonshire) संघाकडून खेळताना त्याने २१ बळी मिळवले.

  • भारतासाठी कामगिरी: चहलने आतापर्यंत भारतासाठी ७२ एकदिवसीय (ODI) आणि ८० टी-२० सामने खेळले आहेत.

  • आंतरराष्ट्रीय पुनरागमन: ऑगस्ट २०२३ मध्ये तो वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

  •  टी-२० विश्वचषक २०२४: भारत जिंकलेल्या २०२४ च्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा तो भाग होता.

  • स्थानिक क्रिकेट आणि आयपीएल: स्थानिक पातळीवर हरियाणाकडून विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चमक दाखवण्यासोबतच, तो आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळत असून आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.


 
Comments
Add Comment

India vs New Zealand Test : टीम इंडियाला मोठा धक्का ! आकाशदीप दुसऱ्या कसोटीतून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाला मिळाली संधी

India vs New Zealand Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची घसरगुंडी! 240 धावांची अजूनही पिछाडी

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या दिवशी

आकाशदीपचा क्राइस्टचर्चमध्ये 'पंजा'; न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांत आटोपला, ब्लंडेलचे शतक हुकले...

मुंबई: क्राईस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी

'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात