Asian Games 2026 : धीरज आणि कुमकुमने रचला इतिहास; मिश्रित रिकर्व्ह तिरंदाजीत भारताला प्रथमच रौप्यपदक!

नागोया (जपान) : जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई खेळ 2026 मध्ये भारताच्या तिरंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत नवा इतिहास रचला आहे. भारतीय तिरंदाज धीरज बोम्मदेवरा आणि कुमकुम अनिल मोहोद यांनी मिश्रित रिकर्व्ह संघ स्पर्धेत भारताला प्रथमच रौप्यपदक मिळवून दिले आहे. अतिशय चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय जोडीला चीनच्या झू जिंगयी आणि ली मेंगची यांच्याकडून 3-5 असा पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे सुवर्णपदक थोडक्यात हुकले.(Archery Asian Games 2026)



अतिशय चुरशीचा ठरला अंतिम सामना


सामन्याची सुरुवात चीनने आक्रमक व दमदार पद्धतीने केली. पहिल्या दोन सेटमध्ये चीनने आपली पकड मजबूत करत आघाडी घेतली. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये भारतीय जोडीने जोरदार पुनरागमन करत सामन्यात उत्तम रंगत आणली. धीरज आणि कुमकुम या दोघांनी शानदार खेळ करत 10-10 गुण टिपले आणि हा सेट जिंकून गुणसंख्या 3-3 अशी बरोबरीत आणली. मात्र, चौथ्या आणि निर्णायक सेटमध्ये चीनच्या जोडीने 37 गुण मिळवत सेट बरोबरीत सोडवला आणि शूट-ऑफची शक्यता संपवली. अखेर चीनने 5-3 असा सामना जिंकून सुवर्णपदक आपल्या नावावर केले, तर भारताला ऐतिहासिक रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या पराभवामुळे भारताला मिश्रित रिकर्व्ह संघ स्पर्धेतून मिळणाऱ्या 'लॉस एंजिल्स 2028 ऑलिम्पिक'च्या कोटा स्थानापासून वंचित राहावे लागले, तर चिनी जोडीने ऑलिम्पिक कोटाही निश्चित केला.



उपांत्य फेरीत जपानवर शानदार विजय


यापूर्वी उपांत्य फेरीत भारताने जपानच्या असाकुनो नानामी आणि नाकानिशी जुन्याा यांच्याविरुद्ध पिछाडीवरून शानदार विजय मिळवला होता. जपानने 3-1 अशी आघाडी घेतली असतानाही, भारतीय जोडीने जिद्द दाखवत सलग चार गुण मिळवले आणि 5-3 च्या फरकाने सामना जिंकून अंतिम फेरीत धडक मारली होती.



भारताच्या पदक तालिकेत मोठी भर


17 वर्षीय कुमकुम अनिल मोहोद हिने या आशियाई खेळांमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. तिने यापूर्वी अंकिता भक्त आणि कीर्ती शर्मा यांच्यासह महिला रिकर्व्ह संघाच्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा 5-3 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले होते. एकाच स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदक नावावर करत तिने तिरंदाजीत भारताचे नाव उंचावले आहे. या ऐतिहासिक रौप्यपदकामुळे आशियाई खेळांमधील भारताच्या एकूण पदकांची संख्या 68 वर पोहोचली आहे. यात 11 सुवर्ण, 24 रौप्य आणि 33 कांस्यपदकांचा समावेश असून, सध्या भारत पदक तालिकेत सातव्या स्थानावर आहे. रिकर्व्ह तिरंदाजीतील या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण देशभरातून धीरज आणि कुमकुम यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Archery Asian Games 2026)

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal retirement: युझवेंद्र चहलची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती; भावनिक पोस्ट शेअर करत दिली चाहत्यांना माहिती

भारताचा स्टार लेग-स्पिनर युझवेंद्र चहल याने प्रथम श्रेणी (रेड-बॉल) क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Asian Games 2026 : कुस्तीत सुजीत कलकलचा ऐतिहासिक पराक्रम! २-९ ने मागे असताना मारली बाजी; भारताला मिळवून दिले 'सुवर्ण'

आयची-नागोया : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताचा युवा मल्ल सुजीत कलकल (Sujit Kalkal)

India vs Pakistan Head to Head: भारताचा सलग सहा सामन्यात विजय, पाकिस्तानला अनेक वर्षांची प्रतीक्षा

एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. एका वर्षाच्या कालावधीत हा

Asian Games 2026: टी20 क्रिकेट गोल्ड मेडलसाठी भारत पाकिस्तान भिडणार, कुठे आणि कधी सामना ते जाणून घ्या

एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या पुरूष टी20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान हे संघ भिडणार आहेत.

World Cup ODI 2027: एकदा नाही तर दोन-तीनवेळा भारत पाकिस्तान सामना होणार, 10 ऑक्टोबरनंतर असे होतील सामना

भारत आणि पाकिस्तान हे संघ मल्टीनेशन स्पर्धेत एकमेकांसमोर उभे ठाकतात. त्यामुळे हे संघ आमनेसामने असले की

Asian Games 2026 : लव्हलिनाचा पंच ठरला 'गोल्डन'! चीनच्या बाओ झियीला नमवत जिंकले सुवर्णपदक

 Asian Games 2026 : भारतीय बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनने आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये दमदार कामगिरी करत महिलांच्या 75 किलो