काकामिगाहारा : जपानमधील काकामिगाहारा येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (Asian Games 2026) च्या अत्यंत रोमहर्षक महिला हॉकी अंतिम सामन्यात भारताने चीनचा पराभव करत ऐतिहासिक सुवर्णपदक अपने नावा केले आहे. या विजयासह भारतीय महिला संघाने तब्बल 44 वर्षांची मोठी प्रतीक्षा संपवली असून, 1982 मधील सुवर्णपदकाच्या सुवर्णक्षणांची पुनरावृत्ती केली आहे.(indians womens hockey team)
अतिशय चुरशीचा ठरला अंतिम सामना
या अंतिम सामन्यात भारतासमोर गतविजेता आणि एफआयएच (FIH) रँकिंगमध्ये उच्च स्थान असलेला बलाढ्य चीन संघ होता. सामन्याच्या सुरुवातीलाच वाहतूक कोंडीमुळे भारतीय संघ नियोजित वेळेच्या अवघ्या 15 मिनिटे आधी मैदानावर पोहोचला होता, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र, या सर्व अडथळ्यांवर मात करत भारतीय खेळाडूंनी मैदानात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्याच क्वार्टरमध्ये खेळाच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन भारताच्या लालरेम्सियामी हमारझोटेने 10 व्या मिनिटाला उत्कृष्ट गोल करत भारताला 1-0 ची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.
सविता पुनियाचा दमदार बचाव
सामन्याच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये चीनला गोल करण्याची सुवर्णसंधी म्हणून 'पेनल्टी स्ट्रोक' मिळाला होता. परंतु, भारताची अनुभवी गोलरक्षक सविता पुनिया हिने आपल्या शानदार कौशल्याचे प्रदर्शन करत चीनचा हा प्रयत्न हाणून पाडला आणि भारताची आघाडी कायम राखली. तिसऱ्या क्वार्टरमध्येही चीनच्या आक्रमक खेळाविरुद्ध भारतीय संघाने अत्यंत खंबीरपणे बचावाची भूमिका पार पाडली. 44 वर्षांनंतर महिला हॉकीत भारताचे हे पहिलेच आशियाई सुवर्णपदक असून, संपूर्ण देशातून भारतीय महिला हॉकी संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.(indians womens hockey team)
एशियन गेम्स 2026 स्पर्धेचा शेवटचा टप्पा सुरू असून भारतीय स्पर्धकांनी जबरदस्त झेप घेतली आहे. भारतासाठी स्पर्धेतील 13वा दिवस खास ठरला आहे. बॉक्सिंगमध्ये ...





