Dharavu Marathi Movie : धाराऊ... ती गाय नाय... माय हाय! दिग्दर्शक मनिष शिंदेचा “धाराऊ” चित्रपट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

मोशन पोस्टरनंतर सोशल मीडियावर उत्सुकता*


मुंबई : “धाराऊ... ती गाय नाय... माय हाय!” या लक्षवेधी टॅगलाइनसह दिग्दर्शक मनिष सुरेश शिंदे (Manish Shinde) यांच्या आगामी “धाराऊ” या मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून, पोस्टर प्रदर्शित होताच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बुलढाणा अर्बन मीडिया हाऊस आणि हिंदचित्र फिल्म्स प्रस्तुत “धाराऊ” हा चित्रपट येत्या २३ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. लेखक, पटकथाकार आणि दिग्दर्शक म्हणून मनिष सुरेश शिंदे यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट असून, गोमातेप्रती असलेली श्रद्धा, भारतीय संस्कृतीतील तिचे महत्त्व आणि माणूस व गोमाता यांच्यातील भावनिक नात्याचा संवेदनशील वेध या चित्रपटातून घेण्यात आला आहे.



“धाराऊ”ची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन मनिष सुरेश शिंदे यांनी केले असून, श्री. राधेश्यामजी चांडक (भाईजी), डॉ. श्री. सुकेशजी झंवर आणि सौ. कोमलजी झंवर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक मनिष शिंदे म्हणाले, “लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ‘धाराऊ’ हा माझा पहिलाच मराठी चित्रपट आहे आणि हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. भारतीय संस्कृतीत गाईला केवळ एक प्राणी म्हणून पाहिले जात नाही, तर तिला आईसमान मानले जाते. याच भावनेला केंद्रस्थानी ठेवून गोमातेचे महत्त्व, तिच्याविषयीची संवेदना आणि समाजातील तिचे स्थान यांचा वेध घेण्याचा प्रयत्न ‘धाराऊ’मधून करण्यात आला आहे. या विषयाच्या माध्यमातून समाजात जनजागृती आणि प्रबोधन निर्माण व्हावे, तसेच गोमातेशी संबंधित ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भ नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, हा चित्रपटामागील प्रमुख उद्देश आहे.”


दिग्दर्शक मनिष सुरेश शिंदे यांच्यासाठी “धाराऊ” चित्रपट खास आहे कारण या चित्रपटाला विविध चित्रपट महोत्सवांमध्ये तब्बल १५ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. या यशानंतर “धाराऊ”कडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. “धाराऊ” हा केवळ एका विषयाभोवती फिरणारा चित्रपट न राहता, प्रेक्षकांना भावनिक पातळीवर जोडणारा आणि विचार करायला प्रवृत्त करणारा अनुभव ठरेल,” असा विश्वास दिग्दर्शकांनी व्यक्त केला आहे. मोशन पोस्टरला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली असून, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी “धाराऊ” महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments
Add Comment

Drishyam The Conclusion X Review : 'दृश्यम: द कन्क्लुजन' ला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद; अजय देवगणच्या चित्रपटाचा सोशल मीडियावर डंका!

मुंबई : वर्षभरातील सर्वात बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेला 'दृश्यम: द कन्क्लुजन' (Drishyam The Conclusion ) अखेर

Nushrratt Bharuccha Accident Update: अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा बाली येथे अपघात, शस्त्रक्रियेची गरज; अधिकृत माहिती समोर

अभिनेत्री नुसरत भरुचा ही कामानिमित्त परदेशात असताना तिचा अपघात झाला. बाली येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु

October Movie Releases 2026 : ॲक्शन, हॉरर, कॉमेडी आणि रोमँटिक ड्रामाचा तडका ! ऑक्टोबरमध्ये थिएटरमध्ये दृश्यम 3 सह 'या' 12 सिनेमांचा धमाका

October Movie Releases : ऑक्टोबर महिना सुरू झाला असून सिनेप्रेमींसाठी हा महिना मनोरंजनाची मोठी पर्वणी घेऊन आला आहे.

Drishyam 3 First Review : 'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवणार ? 'दृश्यम 3'चा फर्स्ट रिव्यू समोर

Drishyam 3 First Review : अजय देवगणच्या बहुप्रतीक्षित ‘दृश्यम 3’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ट्रेलरला मिळालेल्या

Nushrratt Bharuccha: अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा बाली येथे अपघात; रुग्णालयात उपचार सुरु

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा बाली येथे अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. बाली येथे कामाच्या

Prahaar : उज्ज्वल निकम यांच्या ‘प्रहार’ सिनेमात दिसणार ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता, साकारली वकिलाची भूमिका

Prahaar : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी आणि त्यानंतरची कायदेशीर लढाई मांडणाऱ्या ‘प्रहार: द अनटोल्ड