शेगावहून देवीची मूर्ती घेऊन जाताना समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेजवळ शुक्रवारी पहाटे समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दुर्गा मूर्ती आणताना ही दुर्घटना घडली.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेजवळ शुक्रवारी पहाटे समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 18 जण जखमी झाले आहेत. वर्धा येथील सिंदी मेघे परिसरातील सार्वजनिक दुर्गा पूजा उत्सव समितीचे 25 ते 30 कार्यकर्ते टेम्पो-पिकअप वाहनाने शेगाववरून दुर्गा माता मूर्ती घेऊन वर्ध्याकडे परतत होते. तेव्हा बोलेरो पिकअप वाहनाला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की,  वाहनाचा चक्काचूर झाला. गाडीतील काही कार्यकर्ते थेट महामार्गाच्या बाजूला फेकले गेले. अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घनश्याम पाटील, प्रवीण बकाने, गोलू बादलगवार, ओम गावंडे, दत्ताजी खुरसागे, रोशन राऊत व मुनेश्वर ढोले  अशी मृत व्यक्तींची नावं आहेत. मृतांमधील सर्वजण सोमनाथ लेआउट सिंधी मेघे येथील रहिवासी होते. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

वर्धा येथील सिंदी मेघे परिसरातील सार्वजनिक दुर्गा पूजा उत्सव समितीचे 25 ते 30 कार्यकर्ते शेगावला गेले होते.  ही सर्व तरुण मंडळी 28 तारखेस शेगावला पोहचली होती. त्यानंतर शेगाववरून टेम्पो-पिकअप वाहनाने दुर्गा माता मूर्ती घेऊन वर्ध्याकडे परतत होते. बोलेरो पिकअप वाहनाने 30 सप्टेंबर रोजी त्यांचा मूर्तीसह परतीचा प्रवास सूरू झाला. मूर्ती असल्याने वाहन अत्यंत संथ गतीने निघाले होते. अवघ्या 5 च्या स्पीड वाहन चालवत होते असं, रुग्णालयात उपचार घेत असलेले शिवम राऊत यांनी सांगितलं. मूर्ती गावाजवळ पोहचत असतानाच 12 चाकी अजस्त्र ट्रक या गाडीला वेगात येऊन धडकला. महामार्गाच्या अगदी एका बाजूला आमचे वाहन जात असताना आमची काहीच चूक नव्हती. मात्र ट्रक धडकला आणि होत्याचे नव्हते झाले, असे राऊत यांनी सांगितलं.






दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तसेच जखमी रुग्णाची विचारपूस केली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून घटनेची सविस्तर चौकशी करण्यात येत आहे. या दुर्गा मंडळाचे हे आठवे वर्ष आहे. गेल्या पाच वर्षांपासून ही मंडळी समृद्धी मार्गानेच मूर्ती घेऊन येत असतात.  मूर्तीसोबत असल्याने डोळ्यात तेल घालून व दक्ष राहून प्रवास केला जातो. यावेळी 14 फूट उंचीची दुर्गामाता मूर्ती सोबत होती. पण हा प्रवास जीवघेणा ठरला.

                      
                  
Comments
Add Comment

Pavana Dam: पवना धरणग्रस्तांना संपादित क्षेत्राइतकी पर्यायी जमीन; कमाल मर्यादा 4 एकर

Pavana Dam: गेल्या सहा दशकांपासून प्रलंबित असलेल्या पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी

Maharashtra Drought : राज्यातील दुष्काळी तालुक्यांत अनावश्यक बांधकामांना स्थगिती

मुंबई : राज्यातील ३१० दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या टंचाईसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; पायलटने उड्डाण रोखले

सोलापुर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यान त्यांच्या

कार्तिकी वारीसाठी 5 कोटींचा निधी! चंद्रभागेच्या घाटावर उतरले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्वतः हातात पाइप घेऊन केली स्वच्छता

पंढरपूर : कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय; 350 बॉडी कॅमेऱ्यांची करडी नजर, आता चुकूनही नियम मोडू नका

पुणे : वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक

Sanjay Pandey : माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून पुनामिया यांची याचिका फेटाळली

मुंबई : माजी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेले दोन एफआयआर रद्द करण्याच्या मुंबई