मुंबई : 30 सप्टेंबर रोजी MPSC विद्यार्थी प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि मागण्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अत्यंत संवेदनशीलतेने ऐकून घेतल्या होत्या. व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा दृढ करण्यासाठी संविधान आणि कायद्याच्या चौकटीत राहून जास्तीत जास्त निर्णय घेण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता, जो अवघ्या काही तासांत पूर्ण करण्यात आला आहे. 1 ऑक्टोबर रोजी राज्य शासनाने अधिकृत आदेश जारी करत महेंद्र उत्तमराव हरपाळकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सचिवपदी दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली आहे. (Devendra Fadnavis)
मुंबई : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्रिक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये ...
संवेदनशील कार्यपद्धती आणि घेतलेला शब्द पूर्ण — आमदार विक्रम पाचपुते
या महत्त्वपूर्ण निर्णयावर प्रतिक्रिया देताना आमदार विक्रम पाचपुते म्हणाले, “ही संवेदनशील मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धती आहे—विद्यार्थ्यांचे म्हणणे लक्ष देऊन ऐकायचे, शक्य तेवढे सकारात्मक निर्णय घ्यायचे आणि दिलेल्या शब्दाची तातडीने पूर्तता करायची. MPSC व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री साहेब कटिबद्ध असून त्या दिशाने वेगाने निर्णय घेत आहेत.” पुढे बोलताना ते म्हणाले की, कोणतीही अट किंवा घटनात्मक मर्यादा बाजूला ठेवून कोणतीही मागणी पूर्ण करणे शक्य नसते. MPSC ही एक स्वायत्त आणि घटनात्मक संस्था असल्याने, घेतलेला प्रत्येक निर्णय हा संविधान आणि कायदेशीर प्रक्रियेच्या चौकटीतच होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व रास्त मागण्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मात्र त्याचबरोबर या संस्थेची स्वायत्तता देखील पूर्णपणे अबाधित राहावी, हीच आमची स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.