Sunil Tatkare : 'एसआयआर'साठी राष्ट्रवादीची फौज मैदानात, २८८ विधानसभा मतदारसंघांत समन्वयकांची नियुक्ती; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती

मुंबई : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्रिक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये समन्वयकांची नियुक्ती केली आहे. मतदारसंघनिहाय जबाबदारी सोपविण्यात आलेल्या २८८ समन्वयकांमार्फत एसआयआर अभियानाच्या कामावर लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी दिली.


एसआयआर अभियानांतर्गत मतदार याद्यांच्या पुनर्रिक्षणाची प्रक्रिया सुरू असताना पक्षाने विधानसभा मतदारसंघनिहाय संघटनात्मक यंत्रणा उभी केली आहे. त्यानुसार नंदुरबारपासून सिंधुदुर्गपर्यंत आणि मुंबईपासून विदर्भातील विविध जिल्ह्यांपर्यंत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी समन्वयक निश्चित करण्यात आले आहेत. या नियुक्त्यांमध्ये विद्यमान आमदार, माजी आमदारांसह पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.


नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा येथे रतन पाडवी, शहादा येथे सुरेश नाईक, नंदुरबारमध्ये मधुकर पाटील आणि नवापूरमध्ये अविनाश गावित यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात साक्रीसाठी विजय अहिरे, धुळे ग्रामीणसाठी भाऊसाहेब देवरे, धुळे शहरासाठी माजी आमदार डॉ. फारुख शाह, सिंदखेड्यासाठी श्याम सनेर आणि शिरपूरसाठी देविदास कोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी आमदार कैलास पाटील यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांना मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांतही विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यात काटोलपासून कामठी आणि रामटेकपर्यंत सर्व मतदारसंघांसाठी स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली आहे.



मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांतील सर्व विधानसभा मतदारसंघांसाठीही समन्वयक निश्चित करण्यात आले आहेत. नांदेड दक्षिणसाठी माजी आमदार मोहनराव हंबर्डे, देगलूरसाठी माजी आमदार सुभाष साबणे, जिंतूरसाठी माजी आमदार विजय भांबळे, गंगाखेडसाठी माजी आमदार मधुसूदन केंद्रे आणि कन्नडसाठी माजी आमदार नितीन पाटील यांच्यासह पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


नाशिक, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतही मोठ्या प्रमाणावर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ग्रामीण, शहापूर, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, मीराभाईंदर, ठाणे शहर, मुंब्रा-कळवा, ऐरोली आणि बेलापूर यांसह सर्व विधानसभा मतदारसंघांसाठी समन्वयक निश्चित करण्यात आले आहेत.


मुंबई उपनगरातील बोरीवली, दहिसर, मागाठाणे, मुलुंड, विक्रोळी, भांडुप पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, कांदिवली पूर्व, चारकोप, मालाड पश्चिम, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी, घाटकोपर, मानखुर्द-शिवाजीनगर, अणुशक्तीनगर, चेंबूर, कुर्ला, कलिना आणि वांद्रे या मतदारसंघांसाठीही स्वतंत्र समन्वयक देण्यात आले आहेत. मुंबई शहरातील धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी आणि कुलाबा या मतदारसंघांसाठीही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.


रायगडमध्ये पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड या मतदारसंघांसाठी समन्वयक निश्चित करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर-हवेली, भोर, मावळ, चिंचवड, पिंपरी, भोसरी, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे छावणी आणि कसबा पेठ या मतदारसंघांसाठीही पक्षाने जबाबदारी निश्चित केली आहे.


अहिल्यानगर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील मतदारसंघांचाही या नियुक्त्यांमध्ये समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील काही मतदारसंघांसाठी एकापेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच भोर, बीड आणि परळी यांसारख्या मतदारसंघांमध्ये विभागनिहाय अतिरिक्त जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.


एसआयआरच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांशी संबंधित कामासाठी राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघापर्यंत पक्षाची यंत्रणा पोहोचविण्यात आल्याचे या नियुक्त्यांमधून स्पष्ट झाले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या समन्वयकांची यादी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

एसआयआरविरोधातील आंदोलनाला घटनात्मक आधार नाही - मंत्री आशिष शेलार

मुंबई : मतदार यादीच्या विशेष सखोल पडताळणीची (एसआयआर) प्रक्रिया निवडणूक आयोगाने निश्चित कार्यपद्धतीनुसार जाहीर

Mumbai Weather: पुन्हा छत्री काढा! शनिवार- रविवार मुंबईकरांसाठी धोकादायक, पुढचे 48 तासांसाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट

मुंबई: मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा कमालीचा फटका बसणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवाती पासूनच मुंबई, उपनगरातील

Asian Games 2026: भारताचा सुवर्ण दिवस, बॉक्सिंगमध्ये धडाधड गोल्ड मेडलची कमाई

एशियन गेम्स 2026 स्पर्धेचा शेवटचा टप्पा सुरू असून भारतीय स्पर्धकांनी जबरदस्त झेप घेतली आहे. भारतासाठी स्पर्धेतील

Mahendra Harpalkar : ‘एमपीएससी’चे सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली, विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चेनंतर फडणवीस सरकारची कार्यवाही

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या

Nashik : गांधी जयंतीनिमित्त कन्नमवार पुल परिसरात स्वच्छता मोहीम ! मंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके यांचा सहभाग

Nashik : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत विशेष

Navratri Festival : यंदा नवरात्रीत अष्टमी-नवमी एकाच दिवशी, जाणून घ्या घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंतच्या महत्त्वाच्या तारखा

Navratri Festival : नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी यंदाचं नवरात्र विशेष ठरणार आहे. देवीच्या नऊ