Marathi Literature : पुण्यात उभारणार 'अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र'; केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई : अभिजात मराठी भाषा सन्मान दिनाच्या (3 ऑक्टोबर) पूर्वसंध्येला जगभरातील मराठी भाषिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पुण्यातील ऐतिहासिक डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेमध्ये (मानिव अभिमत विद्यापीठ) 'अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र' (Centre of Excellence for Studies in Classical Marathi) स्थापन करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. या महत्त्वाच्या केंद्राच्या उभारणीमुळे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, संशोधनासाठी आणि विविध विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून मोठा निधी उपलब्ध होणार आहे. या केंद्राच्या स्थापनेसाठी तज्ज्ञांमार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला असून, तो लवकरच सादर केला जाईल.



ऐतिहासिक निर्णयाचापुढील टप्पा


भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने 4 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला 'अभिजात भाषेचा' (Classical Language) दर्जा बहाल केला होता. या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णयाचाच पुढील टप्पा म्हणून आता पुण्यात या उत्कृष्ट केंद्राची स्थापना केली जात आहे.



मंत्री उदय सामंत यांनी मानले आभार


या ऐतिहासिक निर्णयावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले, “आज आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे. अभिजात मराठी भाषा सन्मान दिनाच्या पूर्वसंध्येला मिळालेले हे यश आपल्या मराठी संस्कृतीचे आणि भाषेचे वैभव अधिक उंचावणारे आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याबद्दल मी समस्त मराठी भाषिकांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.” या केंद्रामुळे मराठी भाषेचा प्राचीन वारसा, इतिहास आणि साहित्याचा जागतिक पातळीवर विस्तार होण्यास मोठी मदत होणार असून, संशोधकांना हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; सीएसएमटी-विद्याविहार आणि हार्बर-ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत राहणार

मुंबई:

दादासाहेब फाळके चित्रनगरीचा आणखीन विस्तार होणार, सांस्कृतिक कार्य विभागाला जमीन देण्यास शासनाची मान्यता

मुंबई: फिल्म सिटीचा आता आणखीन विस्तार होणार आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीचा आणखीन विस्तार करण्यासाठी

Mumbai Weather: पुन्हा छत्री काढा! शनिवार- रविवार मुंबईकरांसाठी धोकादायक, पुढचे 48 तासांसाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट

मुंबई: मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा कमालीचा फटका बसणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवाती पासूनच मुंबई, उपनगरातील

“कालच्या काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शब्द पाळला” — आमदार विक्रम पाचपुते

मुंबई : 30 सप्टेंबर रोजी MPSC विद्यार्थी प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि मागण्या

Dino Morea Arrest: मोठी बातमी! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाला अटक

मिठी नदीतील गाळ उपसा आणि सफाईच्या कामातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अभिनेता डिनो मोरिया याला मुंबई पोलिसांच्या

BEST Bus Route Changes: बेस्टच्या बसमार्गांमध्ये होणार 'हे' महत्त्वाचे बदल! या फेऱ्या होणार रद्द; जाणून घ्या सविस्तर

मुंबई: बेस्ट बस म्हणजे मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी! मुंबईचा चाकरमानी हा आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रवास करताना