अभिषेक शर्मा सनरायजर्स हैदराबाद सोडणार? संघाबाबत नाखुश असल्याच्या चर्चांना उधाण

इंडियन प्रीमिअर लीग २०२७ (IPL 2027 Auction) च्या लिलावाची तारीख जशी जवळ येत आहे तसे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. कोणत्या खेळाडूला संघात ठेवायचं आणि कोणत्या खेळाडूला संघातून बाहेर काढायचं याबाबत फ्रँचायझीमध्ये चर्चा सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. सोबतच आयपीएलमध्ये सर्वोच्च individual score करणारा Sunrisers Hyderabad चा खेळाडू अभिषेक शर्मा ( Abhishek Sharma ) हा यंदा आपल्या टीमबाबत नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यामुळे यंदा अभिषेक हा हैदराबाद टीममध्ये खेळताना दिसणार नसल्याचे बोलले जात आहे.


यंदा Sunrisers Hyderabad चे कर्णधारपद हे ईशान किशनकडे ( Ishan Kishan )जाणार असल्याच्या चर्चा आहेत तसेच २०२७ च्या व्यस्त वेळापत्रकारामुळे पॅट कमिन्स ( Pat Cummins ) हा आयपीएल साठी अनुपस्थित असल्याचे समजते आहे. या पार्श्वभूमीवर अभिषेक शर्मा नवीन संघाच्या शोधात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अभिषेक शर्माच्या टीम सोडण्याच्या चर्चांनंतर आता तो कोणत्या टीममध्ये जाणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) आणि पंजाब सुपर किंग्स (Punjab Super Kings) या टीमची नावं अग्रस्थानी आहेत.


२०२६ च्या आयपीएलमध्ये पॅट कमिन्सला दुखापत झाल्यानंतर सनरायजर्स हैदराबादचं कर्णधारपद ईशान किशनकडे गेल्याने अभिषेक शर्मा नाखुश असल्याचं दिसत आहे, हे कोणीही टाळू शकत नाही. अभिषेक कर्णधार पदासाठी महत्त्वाकांक्षी असल्याचे स्पष्ट होते. परंतु सध्या क्रिकेटविश्वात अभिषेकच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. अशा स्फोटक फटकेबाजी करणाऱ्या आणि चेंडूवर अचूक प्रहार करण्याची क्षमता असणाऱ्या सलामीवीराला सनरायजर्स हैदराबाद आपल्या संघात कायम ठेऊ शकेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

Asian Games 2026 : भारताने रचला इतिहास! महिला हॉकीत 44 वर्षांची प्रतीक्षा संपवत जिंकले सुवर्णपदक

काकामिगाहारा : जपानमधील काकामिगाहारा येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (Asian Games 2026) च्या अत्यंत रोमहर्षक

Asian Games 2026: भारताचा सुवर्ण दिवस, बॉक्सिंगमध्ये धडाधड गोल्ड मेडलची कमाई

एशियन गेम्स 2026 स्पर्धेचा शेवटचा टप्पा सुरू असून भारतीय स्पर्धकांनी जबरदस्त झेप घेतली आहे. भारतासाठी स्पर्धेतील

Yuzvendra Chahal retirement: युझवेंद्र चहलची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती; भावनिक पोस्ट शेअर करत दिली चाहत्यांना माहिती

भारताचा स्टार लेग-स्पिनर युझवेंद्र चहल याने प्रथम श्रेणी (रेड-बॉल) क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Asian Games 2026 : कुस्तीत सुजीत कलकलचा ऐतिहासिक पराक्रम! २-९ ने मागे असताना मारली बाजी; भारताला मिळवून दिले 'सुवर्ण'

आयची-नागोया : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताचा युवा मल्ल सुजीत कलकल (Sujit Kalkal)

India vs Pakistan Head to Head: भारताचा सलग सहा सामन्यात विजय, पाकिस्तानला अनेक वर्षांची प्रतीक्षा

एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. एका वर्षाच्या कालावधीत हा

Asian Games 2026 : धीरज आणि कुमकुमने रचला इतिहास; मिश्रित रिकर्व्ह तिरंदाजीत भारताला प्रथमच रौप्यपदक!

नागोया (जपान) : जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई खेळ 2026 मध्ये भारताच्या तिरंदाजांनी उत्कृष्ट