भारत न्यूझीलंड सामन्यात काय झालं?
न्यूझीलंडने या सामन्यात पहिल्यांदा गोल आघाडी घेतली होती. 25व्या मिनिटाला जॉन्टी एल्म्सने गोल मारत भारतीय संघावर दबाव वाढवण्याच प्रयत्न केला. पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रुपांतर केलं. मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. कारण अवघ्या काही सेकंदात भारताने प्रत्युत्तर दिलं, उत्तम सिंगने मैदानी गोल मारला आणि 1-1 अशी बरोबरी साधील. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये भारताने आक्रमक खेळ केला. 38 व्या मिनिटाला शारदानंद तिवारीने गोल मारत 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानतर कर्णधार संजय राणा याने 43व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रुपांतर केलं आणि 3-1 अशी आघाडी घेतली. ही आघाडी मोडू काढण्याचा न्यूझीलंडने प्रयत्न केला. 55 व्या मिनिटाला न्यूझीलंडच्या सॅम हिहाने गोल मारत अंतर एका गोलने कमी केलं. पण शेवटच्या टप्प्यात गोल बरोबरी करण्यात अपयश आलं. त्यामुळे भारताने हा सामना 3-2 ने जिंकला.
कॅमरन बेनक्रॉफ्टच्या आरोपानंतर पॅट कमिन्स घरातून बाहेर पडणं झालं कठीण! पत्रकारांकडून प्रश्नांचा भडीमार
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 2018 मध्ये कसोटी मालिका पार पडली होती. या मालिकेतील एका सामन्यात चेंडूसोबत छेडछाड करण्यात आली होती. यासाठी ...
काय आहे या शताब्दी मालिकेचा इतिहास?
1926 मध्ये हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्यासह भारतीय हॉकी संघाने पहिल्यांदाच न्यूझीलंडचा ऐतिहासिक दौरा केला होता. न्यूझीलंडच्या भूमीवर पाऊल ठेवणारा पहिलाच भारतीय क्रीडा संघ होता. या ऐतिहासिक घटनेला 2026 मध्ये बरोबर शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली शतकपूर्तीचे औचित्य साधत न्यूझीलंड हॉकी बोर्डाकडून विशेष मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. '2026 भारत-न्यूझीलंड सेंच्युरी ऑफ स्पोर्टिंग युनिटी इव्हेंट' असे या स्पर्धेचे अधिकृत नाव असून, ही निमंत्रित स्पर्धा असल्याने या सामन्यांची गणना अधिकृत सामने म्हणून केली जाणार नाही.