मुंबई: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नोकरदारांचा प्रवास आता आणखीन गारेगार होणार आहे. मुंबई लोकलच्या ताफ्यामध्ये आणखीन 20 नव्या एसी लोकल दाखल होणार आहेत. त्यासाठी मुंबईकरांना 2027 वर्षाच्या सुरूवातीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखीन गारेगार होणार आहे. सध्या मध्य रेल्वेवर 120 आणि पश्चिम रेल्वेवर 147 एसी लोकलच्या फेऱ्या होत आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या एकूण एसी लोकलच्या रॅक्सची संख्या पाहता ताफ्यामध्ये पुरेशा प्रमाणात लोकल उपलब्ध आहेत. लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी रेल्वेकडून मुंबई उपनगरीय रेल्वेच्या ताफ्यामध्ये नवीन वर्षात 20 एसी लोकल गाड्यांची भर पडणार आहे.
मुंबई: दादर येथील शिवाजी पार्क परिसरात पूर्वपरवानगी न घेता आंदोलन केल्याप्रकरणी कॉकरोच जनता पक्षाचा (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके याच्यासह सुमारे 500 ...
चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी अर्थात आयएफसीकडून लोकलची बांधणी प्रक्रिया सुरू आहे. मुंबई लोकलच्या ताफ्यामध्ये येत असलेल्या लोकल ह्या एसी लोकल असणार आहेत. 2027 च्या सुरूवातीला पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली जाणार आहे. दरम्यान, मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (MUTP) 3 आणि 3 अ अंतर्गत 238 एसी लोकलच्या बांधणीला केंद्र आणि राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. एसी लोकल गाड्यांची सुरुवातीला निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. पण या प्रक्रियेनुसार पहिली लोकल येण्यास सुमारे चार वर्षांचा काळ अपेक्षित होता. हा विलंब टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने थेट रेल्वे कारखान्यांमध्येच गाड्या बांधण्याचा निर्णय घेतला.
मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिके मार्फत सन 2013 पासून राबविण्यात येत असलेल्या "स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान (वस्ती स्वच्छता योजना)" योजनेत ...
सध्या ज्या एसी लोकल रूळांवर धावत आहेत, तशाच लोकलची निर्मिती केली जात असल्याची माहिती आयसीएफने दिली आहे. त्यामळे चाचणी घेण्याची गरज न भासता थेट या लोकल मुंबईत दाखल होताच त्या प्रवासी सेवेसाठी रूळांवर उतरवण्यात येणार आहे. लोकलच्या कामाला रेल्वेकडून गती मिळाली असून काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. 2027 या वर्षामध्ये मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे अशा या दोन्हीही मार्गावर तब्बल 20 एसी लोकल नव्याने दाखल होणार आहे. साधारणत: एक एसी लोकल दिवसाला 12 ते 14 फेऱ्या मारते. त्यामुळे नव्या एसी लोकलमुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर 240 ते 280 फेऱ्या सुरू होण्याची शक्यता आहे. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता लोकलच्या फेऱ्याही वाढवल्या जाणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रदूषणकारी स्रोतांवर प्रभावी उपाययोजना तसेच नियमभंग करणाऱ्यांवर कठोर ...
रेल्वे मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, आयसीएफसह कपूरथला येथील रेल कोच फॅक्टरी (RCF) आणि रायबरेलीतील मॉडर्न कोच फॅक्ट्री (MCF) या तिन्ही कारखान्यांमध्ये मिळून एकाच वेळी 238 एसी लोकलची बांधणी केली जाणार आहे. यामध्ये आयसीएफ ही नोडल एजन्सी म्हणून समन्वय साधणार आहे. या संपूर्ण महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत 2030 पर्यंत सर्व 238 नव्या गाड्या मुंबईच्या रुळावर धावत्या करण्याचे रेल्वे प्रशासनाचे नियोजन आहे. यामुळे आगामी काही वर्षांत मुंबई उपनगरीय रेल्वेचे चित्र पूर्णपणे बदलून जाईल आणि प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधांचा अनुभव घेता येईल.