Asian Games 2026: गोल्फ स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी, प्रणवीने गोल्ड मिळवून रचला इतिहास

एशियन गेम्स 2026 स्पर्धेचा शेवटचा टप्पा सुरू असताना भारतीय स्पर्धकांनी मोठी झेप घेतली आहे. धडाधड गोल्ड मेडल मिळवून पदकतालिकेतील गुणांकन सुधारलं आहे. कुस्ती, तिरंदाजी, बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय स्पर्धकांना जबरदस्त कामगिरी केली. असं असताना एक अनपेक्षित गोल्ड भारताच्या पदरात पडलं आहे. खरं तर अशा भावना क्रीडाप्रेमींच्या आहेत. कारण भारताला गोल्फमध्ये सुवर्णपदक मिळेल असं क्रीडाप्रेमींच्या ध्यानीमनी नव्हतं. पण महिला गोल्फपटू प्रणवीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आणि भारताच्या पदरात गोल्ड मेडल टाकलं. प्रणवीच्या या कामगिरीचं भरभरून कौतुक होत आहे. कारण एशियन गेम्स स्पर्धेत भारताला गोल्ड मेडल मिळवून देणारी ती पहिली महिला गोल्फपटू ठरली आहे. प्रणवीने एकूण 15 अंडर 265 स्कोअरसह सुवर्ण पदक पटकावलं. चीच्या यिन रुओनिंगने रौप्य, तर सिंगापुरच्या शैनन टनने कांस्य पदक नावावर केलं.


या यशानंतर प्रणवीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तिने आपल्या कामगिरीवर आनंद व्यक्त करत सांगितलं की, 'मला कोणतंही काम सर्वात आधी करणं पसंत आहे. लोकं पुढे जाऊन बरंच काही करतील, पण माझं नाव सर्वात पुढे असणार आहे.' दुसरीकडे, प्रणवीच्या या कामगिरीमुले भारतीय गोल्फ संघाला रौप्य पदकही आपल्या नावावर करता आला आहे. प्रणवीसह अदिती अशोक आणि दीक्षा डगर यांच्या कामगिरीने रौप्य पदक नावावर झालं आहे. सांघिक पदक गुणतालिकेतील दोन सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्या खेळाडूंच्या आधारावर ठरवले जाते. या परिस्थितीत, भारताचा एकूण स्कोर 14-अंडर 546 होता. चीनने 22-अंडर 538 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. एशियन गेम्स स्पर्धेत भारताच्या पदरात गोल्फ प्रकारात 22 वर्षानंतर गोल्ड पदक आलं आहे. 2002 मध्ये शिव कपूरने पुरूषांच्या एकेरीत सुवर्ण पदक पटकावलं होतं. भारताचं हे गोल्फमधील पहिलं पदक होतं 1982 मध्ये एशियन गेम्सनंर भारताची सर्वोत्तम कामगिरी होती.



अशी झाली लढत


अंतिम फेरीपूर्वी 15-अंडर 195 च्या उत्कृष्ट स्कोअरसह प्रणवीने आघाडी घेतली होती. मात्र, अंतिम फेरीची सुरुवात प्रणवीसाठी अत्यंत खडतर ठरली. ट्रिपल बोगी झाल्यामुळे तिची आघाडी धोक्यात आली. याच वेळी रुओनिंग यिनने बर्डी मारली, तर टॅनने पहिल्या तीन होलमध्ये दोन बोगी केल्या, ज्यामुळे चीनची खेळाडू पुन्हा एकदा सुवर्णपदकाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार बनली. अशा बिकट आणि दबावाच्या परिस्थितीतही प्रणवीने प्रचंड मानसिक संयम दाखवला. तिने सहाव्या, दहाव्या आणि तेराव्या होलवर सुरेख बर्डी मारत पुन्हा एकदा सामन्यावर पकड मिळवली आणि आपले पहिले आशियाई क्रीडा सुवर्णपदक निश्चित केले.




                  
Comments
Add Comment

IND vs WI 3rd ODI: रोहित शर्माला विश्रांती, यशस्वी-गिल सलामीला; वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात मोठे बदल!

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना न्यू चंदीगड येथे

Asian Games 2026 : महामुकाबल्यात भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; पाकिस्तानशी सुवर्णपदकासाठी टक्कर

निशिन, जपान: आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (Asian Games 2026) मधील पुरुष क्रिकेटच्या अत्यंत रोमहर्षक आणि बहुप्रतिक्षित

भारत विरुद्ध पाकिस्तान सुवर्णपदकाचा महामुकाबला; वेळेपासून पावसामुळे काय होईल ते जाणून घ्या संपूर्ण माहिती!

Japan: आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (Asian Games 2026) मध्ये आजचा दिवस अत्यंत रोमांचक आणि महत्त्वाचा आहे. क्रीडाप्रेमींचे लक्ष

Asian Games 2026 : भारताचा सुवर्णधमाका! कुमकुम मोहोडने रचला इतिहास; फायनलमध्ये कमाल

नागोया : जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (Aichi-Nagoya Asian Games 2026) च्या चौदाव्या दिवशी

रत्नागिरीची सुकन्या आकांक्षा कदम कॅरम वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे करणार प्रतिनिधित्व; इटलीत होणार स्पर्धा

रत्नागिरी

अभिषेक शर्मा सनरायजर्स हैदराबाद सोडणार? संघाबाबत नाखुश असल्याच्या चर्चांना उधाण

इंडियन प्रीमिअर लीग २०२७ (IPL 2027 Auction) च्या लिलावाची तारीख जशी जवळ येत आहे तसे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे.