BYD ची लक्झरी गाडी Denza आता भारतात येणार; फीचर्स पाहून व्हाल थक्क!

इलेक्ट्रॉनिक्स व्हेहिकल (EV) क्षेत्रात नामांकित असलेल्या BYD ने आपला लक्झरी ब्रँड Denza भारतात दाखल होणार असल्याची घोषणा केली आहे. BYD India च्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ब्रँडचा लोगो आणि नाव टाकून खाली Arriving Soon म्हणजेच 'लवकर येत आहे' असे कॅप्शन देण्यात आले आहे. Denza भारतात दाखल होण्याची तारीख आणि इतर तपशील हे जरी समोर आले नसले तरी ऑटोमोबाईलप्रेमी तसेच वाहन खरेदीदारामंध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ही ईव्ही कार अत्याधुनिक, उच्च कार्यक्षम असेल, असे आश्वासन देखील देण्यात आले आहे.


या वर्षाच्या अखेरीस डेन्झा डी९ एमपीव्ही आणि डेन्झा झेड९ जीटी हे मॉडेल्स भारतात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डी९ मॉडेलची किंमत ८० लाखांपर्यंत असण्याचा अंदाज असून ही कार भारतात टोयोटा वेलफायरशी स्पर्धा करू शकते. दरम्यान, डेन्झा झेड९ जीटी हे मॉडेल एका विशिष्ट वर्गाची गरज पूर्ण करेल. तिची किंमत १.२ कोटी ते १.५ कोटींच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. यात 122.5 kWh क्षमतेची बॅटरी असेल असेदेखील सांगण्यात येते.


२०१० मध्ये स्थापन झालेली Denza ही सुरुवातीला प्रीमियम नवीन इलेक्ट्रिक व्हेहिकल्स बनवण्यासाठी BYD आणि Mercedes Benz यांचा संयुक्त उपक्रम होता. BYD ने बॅटरी आणि पावरक्षमतेमध्ये आपले योगदान दिले तर Mercedes Benzने डिझाईनमध्ये आणि अभियांत्रिकी मध्ये योगदान दिले. त्यानंतर २०२४ मध्ये Mercedes Benz पूर्णपणे यामधून बाहेर आल्यानंतर संपूर्ण मालकी ही BYD कडे गेली.


Denza ची वैशिष्ट्ये


Z9 GT
या गाडीत १२२.५ kWh क्षमतेची बॅटरी असेल. ही कार ०-१०० किमी प्रति तास वेग २.७ सेकंदात गाठते. तिचा कमाल वेग २७० किमी प्रति तास आहे आणि रेंज ६०० किमी आहे. बॅटरी १० - ९७ टक्के चार्ज होण्यासाठी फक्त ९ मिनिटे लागतात.


D9 MPV
या गाडीमध्ये १०३ kWh बॅटरी आणि समोरच्या बाजूला मोटार बसवली असल्याची शक्यता आहे. ही गाडी WLTP नुसार ५२० किमीची रेंज देते आणि २०० kW पर्यंतच्या डीसी चार्जिंगला सपोर्ट करते. आतमध्ये २+२+३ अशी आसनव्यवस्था असण्याची शक्यता आहे. गाडीची किंमत ९० लाखांच्या आसपास असू शकते.

Comments
Add Comment

हरिमौ शक्ती-6 चा धमाका! मलेशियात भारत-मलेशिया सैन्याचा महासराव सुरू; रणनीती नेमकी काय?

नवी दिल्ली : भारत आणि मलेशिया यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक बळकट करणारा ‘हरिमौ शक्ती-6’ हा संयुक्त

अ‍ॅमस्टरडॅमच्या महापौरांनी घेतली मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची भेट

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची अ‍ॅमस्टरडॅम नगरीच्‍या महापौर फेम्के हलसेमा यांनी आज,

Pavana Dam: पवना धरणग्रस्तांना संपादित क्षेत्राइतकी पर्यायी जमीन; कमाल मर्यादा 4 एकर

Pavana Dam: गेल्या सहा दशकांपासून प्रलंबित असलेल्या पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी

भांडुप संकुलातील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प कामाला गती; अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईची दीर्घकालीन जलसुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने भांडुप नवीन जलशुद्धीकरण

Andheri Kurla Road : अंधेरी-कुर्ला मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार, तब्बल १३.४० मीटर रुंदीच्या रस्त्यावरील अडथळे दूर करणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) रस्त्यांवरील वाहतुकीचे अडथळे दूर करून वाहतूक अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने मुंबई

Crime News : 'तुला सरकारी नोकरी लावून देतो' सांगत घातला 40 लाखांचा गंडा; वडापाव विकणाऱ्या दाम्पत्याची मोठी फसवणूक

कल्याण : कल्याणमध्ये वडापावचा व्यवसाय करणाऱ्या एका दाम्पत्याला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 40