मुंबई: 2005 साली रिलीज झालेल्या 'बंटी और बबली' चित्रपटातल्या 'कजरा रे' गाण्याने प्रेक्षकांच्या मनामध्ये आजही घर केलेलं आहे. कोणतीही पार्टी असो किंवा इतरत्र काही कार्यक्रम असो, हे गाणं आवश्य वाजतंच. शाद अली दिग्दर्शित, 'बंटी और बबली' चित्रपटातलं 'कजरा रे' गाणं शंकर महादेवन, जावेद अली आणि अलिशा चिनॉय यांनी गायलं आहे. 21 वर्षे झाले असले तरीही आजही या गाण्याची मोहिनी प्रेक्षकांवर कायम आहे. बिग बी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे तिन्ही कलाकार एकत्र झळकले होते. या गाण्याच्या शुटिंगदरम्यानचा किस्सा अभिषेक बच्चनने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितला आहे. शिवाय, गाण्याच्या रिमेकबद्दलही त्याने भाष्य केले आहे.
अजय देवगणचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'दृश्यम 3: द कन्क्लुजन' 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व सुरुवात केली आहे. विजय साळगावकर ...
बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीमध्ये, अभिषेकने 'कजरा रे' गाण्याबद्दल आठवणी सांगितल्या की, "जेवढी मज्जा मला 'कजरा रे' गाण्याच्या शुटिंगवेळी आली, तेवढी मज्जा बाकी इतर कोणत्याही गाण्याच्या वेळी आली नाही. त्या गाण्याच्या शुटिंगवेळी आमच्यासाठी एक आनंदाचा सोहळाच होता. फक्त मीच नाही तर, आम्ही सर्वांनी गाण्याच्या शुटिंगवेळी खूप मज्जा केली. आमच्या शुटिंगची गंमती जंमती आजही माझ्या डोळ्यांसमोरून जातात. शुटिंग सुरू होती आणि त्या दिवशी माझा वाढदिवस होता, मला अजूनही आठवतंय. दिग्दर्शकांनी माझा वाढदिवस सेटवर सेलिब्रेट केला होता." मुलाखतीमध्ये अभिनेत्याने पुढे गाण्याच्या शुटिंग दरम्यानचा किस्सा सुद्धा शेअर केला.
Nushrratt Bharuccha Health Update : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा हिच्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बालीमध्ये अपघात झाल्यानंतर नुसरतला गंभीर दुखापत झाली असून, ...
अभिषेक पुढे म्हणाला की, "चित्रपटाचे दिग्दर्शक शाद अली यांनी 'कजरा रे' गाणं पार्टीमध्ये लावलं होतं. आम्ही जवळपास चार तास फक्त डान्स पार्टीच केली होती. आम्ही सर्व डान्स करतोय हे शूट करण्यात आलं होतं. सेटवरची धम्माल मस्ती, आम्ही डान्स करतोय ते सीन्स, आम्ही मनसोक्त करत असलेली एन्जॉयमेंट सर्व गोष्टींचं शुट करण्यात आलं होतं. तेच सर्व शॉर्ट्स गाण्यामध्ये वापरण्यात आले आहेत. हे गाणं कल्ट ठरलं आहे. पण खरंच सांगतो, 'कजरा रे' गाण्याच्या शुटिंगवेळी मला जितकी मज्जा आली ना, तेवढी मज्जा इतर कोणत्याही गाण्याच्या वेळी मज्जा आली नाही. त्या खूप चांगल्या आठवणी आहेत माझ्यासाठी.", असं अभिनेत्याने शुटिंग वेळी सांगितलं.
हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अष्टपैलू अभिनयाने आणि गंभीर-सहज भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते संजीव कुमार हे केवळ एक उत्कृष्ट ...
अभिषेकला 'कजरा रे' गाण्याच्या रिमेकसाठी म्हणजेच, 2.0 व्हर्जन करण्यास इच्छुक आहेस का? असा प्रश्न विचारला. तो म्हणाला की, "मला नक्कीच आवडेल गाण्याचं रिमेक करायला. मी त्या गाण्यासाठी नेहमी तयार आहे. मला नक्कीच आवडेल. पण, त्यासाठी तुम्हाला ऐश्वर्या आणि माझ्या वडिलांनाही तयार करावं लागेल." 'कजरा रे' गाण्याच्या शुटिंगवेळी अभिषेक- ऐश्वर्याचं लग्न झालं नव्हतं. गाण्याच्या शुटिंगच्या दोन वर्षांनंतर अभिषेक- ऐश्वर्याने लग्नगाठ बांधली.