Pankaj Bhoyar : सीजेपीच्या आंदोलनात असामाजिक घटकांची घुसखोरी ?

- संशयितांचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध सुरू; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती


मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) मुंबईतील शिवाजी पार्क येथे केलेल्या आंदोलनात असामाजिक घटक सहभागी झाले होते का, याचा पोलीस तपास सुरू आहे. आंदोलनाचे सीसीटीव्ही आणि अन्य व्हिडीओ फुटेज पोलिसांनी मागविले असून, त्यातून संबंधित व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. आंदोलनाला पोलिसांची परवानगी नसल्याने स्थानिक वकिलाने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे.


२ ऑक्टोबरला सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी पार्क येथे हे आंदोलन झाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी हे आंदोलनाचे प्रमुख कारण होते. प्रशासनाने आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तरीही मोठ्या संख्येने आंदोलक शिवाजी पार्क परिसरात जमले. आंदोलनानंतर स्थानिक वकिलाकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.


याबाबत विचारले असता गृहराज्यमंत्री म्हणाले, आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे; मात्र आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असेल किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर पोलीस कायद्याच्या चौकटीत कारवाई करतील. कालच्या आंदोलनात काही असामाजिक घटक सहभागी झाले होते का, याची माहिती घेतली जात असून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


आंदोलनात असामाजिक घटक सहभागी झाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे आंदोलनस्थळावरील सीसीटीव्ही आणि उपलब्ध व्हिडीओ फुटेजच्या आधारे तपास केला जात आहे. काही जण ‘अर्बन नक्षल’ विचारांचे सहभागी होते, या आरोपांचीही शहानिशा केली जात असल्याचे भोयर यांनी सांगितले; मात्र या आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.


दरम्यान, शिवाजी पार्कमध्ये आंदोलन केल्याप्रकरणी स्थानिक वकील सिद्धी देवळेकर यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या २०१३ मधील आदेशाचा दाखला देत शिवाजी पार्क परिसरात अशा प्रकारच्या आंदोलनांना परवानगी नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.



समृद्धी महामार्गावर १५ मदत केंद्रे


समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी १५ ठिकाणी मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर लक्ष ठेवण्यात येत असून, महामार्गावरील सीसीटीव्ही यंत्रणेतही वाढ करण्यात येणार असल्याचे भोयर यांनी सांगितले. टोलनाक्यांवरून नियमबाह्य वाहनांना प्रवेश मिळू नये, याबाबतही सूचना देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

पाऊस संपला, उकाडा वाढणार! मुंबईतून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी; IMD ची घोषणा

यंदा अत्यल्प पावसामुळे उकाडा आणि गर्मीने नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. अशातच आज (३ ऑक्टोबर २०२६) भारतीय हवामान

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘डीपीसी’चा निधी गोठवला; रस्ते, पायाभूत सुविधांच्या कामांना ब्रेक

जलसंधारण, टँकर आणि चारा छावण्यांसाठी निधी वळवणार मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर

Dhule Crime News : धुळे हादरले ! आधी महिलेला ब्लॅकमेल केलं, नंतर संतापजनक कृत्य... ; तीन नराधम ताब्यात

Dhule Crime News : धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या (Azad Nagar Police Station) हद्दीत महिलेला धमकावत आणि ब्लॅकमेल करत तिच्यावर

Drowning Incident : अमरावतीत दुर्दैवी घटना; रत्नापूर तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

अमरावती: रायगड येथील दुर्घटनेची बातमी ताजी असतानाच अमरावतीमधून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. शहरात

Nitesh Rane News: महाराष्ट्राच्या 877 किमी किनारपट्टीचा एकात्मिक विकास साधणार, मंत्री नितेश राणे यांची घोषणा

मुंबई: महाराष्ट्राची ८७७ किलोमीटर लांबीची किनारपट्टी, बंदरांचे विस्तृत जाळे आणि मजबूत औद्योगिक व उत्पादन

'भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र'ला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पोस्ट

मुंबई: मराठी भाषिकांसाठी अभिमानास्पद बातमी आहे. अभिजात मराठी भाषा सन्मान दिवसाच्या पुर्वसंध्येला केंद्र