Nitesh Rane News: मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यात आदित्य ठाकरेंची चौकशी करा, शिवसेनेची मागणी

मिठी नदी गाळ उपशात झालेल्या घोटाळ्यात अभिनेता डिनो मोरिया याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून, या प्रकरणी उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांची चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केली.

मुंबई: मिठी नदी गाळ उपशात झालेल्या ६५ कोटींच्या घोटाळ्यात अभिनेता डिनो मोरिया याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून, या प्रकरणी उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांची चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी शनिवारी केली. आदित्य ठाकरे आणि डिनो मोरिया यांचे व्यावसायिक संबंध असल्याने, कोविड काळात मुंबई महापालिकेतून दिलेल्या कंत्राटांची श्वेत पत्रिका काढावी अशी मागणी त्यांनी केली.






बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत म्हात्रे म्हणाल्या, की डिनो मोरियाची अटक हे मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यातील हिमनगाचे टोक आहे. या घोटाळ्यात डिनोचा खास मित्र आदित्य ठाकरे याचा थेट संबंध आहे. उबाठाची सत्ता असताना डिनो मोरिया पालिकेत वारंवार यायचा. मोरिया आणि कंत्राटदार केतन कदम पार्टनर असल्याचे संभाषणातून सिद्ध झाले आहे. डिनो आणि आदित्य ठाकरे यांची प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमध्ये कमिशन घेणारी वसुली गँग आहे, असा खळबळजनक आरोप म्हात्रे यांनी केला. कोविडकाळातील खिचडी घोटाळा, बॉडी बॅग घोटाळा, कोविड सेंटर घोटाळा, ऑक्सिजन प्लॅन्ट अशा कॉन्ट्रॅक्टची सखोल चौकशी होऊन श्वेत पत्रिका काढावी, अशी मागणी म्हात्रे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांकडे केली.






त्या पुढे म्हणाल्या की दिशा सालियन हत्याप्रकरणात डिनो मोरिया याचे नाव आहे. मिठी नदी घोटाळा असो किंवा दिशा सालियन हत्याकांड असो डिनो मोरिया याचे नाव पुढे येत आहे. त्यामुळे डिनो मोरिया याच्या मोबाईल मधील चॅट आणि कॉल डेटा जनतेसमोर यायला हवा. यातून अनेक गोष्टींचा उलगडा होईल. डिनो मोरियाची ज्या प्रकारे चौकशी सुरू आहे, त्याच प्रकारे आदित्य ठाकरेची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करावी, अशी मागणी म्हात्रे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली. यासंदर्भात शिवसेनेकडून मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र दिले जाईल, असे म्हात्रे म्हणाल्या.

Comments
Add Comment

Rinku Meets Modi: क्रिकेटर रिंकु सिंगने सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, दिलं लग्नाचं आमंत्रण...

मुंबई: भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज रिंकू सिंग लवकरच आयुष्यातील नव्या इनिंगची सुरूवात करणार आहे. यासाठी रिंकू

थिएटरमध्ये तुफान कमाई केल्यानंतर 'हनुमान अंश' OTT वर रिलीज होणार, कुठे होणार रिलीज; जाणून घ्या तारीख

मुंबई: विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित, 'हनुमान अंश' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत सर्वांचेच लक्ष वेधले. 2

Mumbai Fire: परळच्या कामगार स्टेडियममध्ये भीषण आग, लाकूड आणि बांबूच्या साहित्याला आग; जीवितहानी नाही

मुंबई: मुंबईतील दादर पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील प्रसिद्ध कामगार स्टेडियममध्ये रविवारी

ठाण्यात खळबळ! मासुंदा तलावात 32 वर्षीय महिलेची उडी; पुढे जे घडलं ते पाहून सर्वच थक्क!

ठाणे: ठाण्यातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या तलावपाळी (मासुंदा तलाव) परिसरात शुक्रवारी रात्री एक थरारक घटना समोर

महाराष्ट्रात 1440 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती; ग्रामीण आरोग्य सेवेला मिळणार बळकटी

मुंबई: महाराष्ट्र सरकारने जनतेला उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने

फळबागा जगविण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचे आश्वासन

मुंबई: राज्यात फळबागा असलेल्या एकूण 6 लाख 85 हजार हेक्टर क्षेत्रापैकी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात सुमारे 2.5 लाख