सोमेश्वर कुणा एकाची खासगी मालमत्ता नाही, हा शेतकऱ्यांच्या विश्वासाचा कारखाना; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य

बारामती: दादांची जबाबदारी आता मी घेतली असून शेतकरी आणि कारखान्याच्या प्रत्येक अडचणीसाठी मी खंबीरपणे उभी आहे. कोणतीही अडचण आली तरी दादांप्रमाणेच प्रत्येक बाबतीत आपल्या पाठीशी उभी राहिन असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिला.


अजितदादांनी दिलेल्या दिशेनेच आपण पुढे जायला हवे. सोमेश्वर कारखाना कुणा एका व्यक्तीची वैयक्तिक मालमत्ता नाही. ही संस्था सभासदांच्या विश्वासातून उभी राहिली आहे. कारखान्याच्या यशाचे श्रेय कोणत्याही एका व्यक्तीचे नसून हजारो सभासद आणि शेतकऱ्यांचे आहे,” असेही सुनेत्रा पवार यांनी ठणकावून सांगितले.


सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिरात नारळ फोडून झाला. यावेळी कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



आदरणीय लोकनेते अजितदादा पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाला आपण दिलेला प्रचंड प्रतिसाद माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.


“सोमेश्वर साखर कारखाना हा केवळ एक कारखाना नाही, तर हजारो शेतकरी सभासदांचा विश्वास आहे. अनेक पिढ्यांपासून शेतकऱ्यांनी ही संस्था जपली आहे. बळीराजा आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारी ही संस्था आहे असे सांगतानाच दादांच्या जाण्याने इथला बांध न बांध, शेती आणि परिसर सुना झाला आहे. इथल्या प्रत्येक गोष्टीत दादांचा श्वास होता. दादा स्वतः शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्यासाठी काय केले पाहिजे, याची त्यांना जाणीव होती अशी आठवणही सुनेत्रा पवार यांनी सांगितली.


१९९२ मध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दादांनी कारखान्याची जबाबदारी स्वीकारली. सर्व सहकाऱ्यांना सोबत घेत त्यांनी कारखाना उभा केला. कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी त्यांनी आपली आमदारकी पणाला लावली. तब्बल ३४ वर्षे त्यांनी सोमेश्वर कारखान्यासाठी जीवाचे रान केले पण दादांनी कधीही आपल्या कामाचे गुणगान केले नाही. त्यांना फक्त काम करणे माहीत होते. कोणतेही मोठे काम एका दिवसात होत नाही. ३४ वर्षे त्यांनी या कारखान्यासाठी दिली. त्यामुळे आता निर्णय घेताना शेतकऱ्यांनी या कामाचा विचार करणे आवश्यक आहे असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.



सोमेश्वर परिसरातील शेतकऱ्यांना पाणी कमी पडू नये यासाठी दादांनी जनाई-शिरसाई आणि पुरंदर उपसा योजनेसारख्या महत्त्वाच्या योजना पुढे नेल्या. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत झाली. दादांच्या दूरदृष्टीमुळे सोमेश्वर कारखाना शेतकऱ्यांना सर्वोच्च दर देऊ शकला. आज कारखान्याने मिळवलेले यश हे दादांच्या अथक प्रयत्नांचे फलित आहे हेही आवर्जून सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.


ही निवडणूक कुण्या एका व्यक्तीचा पराभव करण्यासाठी किंवा गटबाजीसाठी नाही, तर शेतकरी हितासाठी आहे. निर्णय घेताना व्यक्तीपेक्षा काम आणि आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष काम पहा असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले.


पक्षाच्या पद्धतीप्रमाणे सर्वांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर निरीक्षक नेमण्यात आले. सर्वांच्या भावना आणि मतांचा विचार करून सर्वसमावेशक संचालक मंडळ तयार करण्यात आले आहे. सहकारात सगळ्यांना सोबत घेऊन चालणे म्हणजेच सहकार. ‘माझे एकट्याचेच ऐका’ असे सहकारात चालत नाही. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. मात्र सहकाराची परंपरा आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे हीच आमची भूमिका आहे,” असेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.



माझा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. त्यामुळे आदरणीय दादांचे नाव वापरण्याची गरज नाही. जर कोणाला दादांच्या कुटुंबाच्या निर्णयाविरोधात जाऊन निवडणूक लढवायची असेल, तर त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवावी. दादांच्या नावाचा वापर करायचा आणि त्यांच्याच कुटुंबाला बदनाम करायचे, हे योग्य नाही आणि हे चालणार नाही असा स्पष्ट संकेतही सुनेत्रा पवार यांनी दिला.


दादांनी ज्या विश्वासाने हा कारखाना जपला, त्याच विश्वासाने दादानंतरही मी हा कारखाना जपणार आहे. संचालक मंडळातील २१ जणांना विश्वासात घेऊनच चेअरमनची निवड केली जाईल अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली.


अजितदादांनी दाखवलेल्या विकासाच्या दिशेने सोमेश्वर कारखाना पुढे नेण्यासाठी सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी केले.

Comments
Add Comment

Navratri 2026: यंदा दांडिया-गरबासाठी वेळेचे निर्बंध, कसे असेल वेळापत्रक

मुंबई: नवरात्रौत्सव (Navratri) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वांनाच आता गरबा-दांडीयाचे (garba in Navratri) वेध लागलेत.

Mumbai Tour: भाजपा मुंबईच्या वतीने ‘मुंबई डेव्हलपमेंट टूर’; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, कंटेंट क्रिएटर्सना मुंबईच्या विकासकामांची मिळणार माहिती

मुंबई: भाजपा मुंबईच्या वतीने उद्या ‘मुंबई डेव्हलपमेंट टूर’ करण्यात येणार आहे. या टूरच्या माध्यमातून मुंबई

Nitesh Rane News: मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यात आदित्य ठाकरेंची चौकशी करा, शिवसेनेची मागणी

मुंबई: मिठी नदी गाळ उपशात झालेल्या ६५ कोटींच्या घोटाळ्यात अभिनेता डिनो मोरिया याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक

Mumbai Local: नोकरदारांसाठी गुड न्यूज! मुंबई लोकलच्या ताफ्यात नवीन वर्षात 20 एसी लोकल; तब्बल 280 फेऱ्या वाढणार

मुंबई: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नोकरदारांचा प्रवास आता आणखीन गारेगार होणार आहे. मुंबई लोकलच्या

Abhijeet Dipke: विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी अभिजित दीपकेसह 500 जणांवर गुन्हा दाखल

मुंबई: दादर येथील शिवाजी पार्क परिसरात पूर्वपरवानगी न घेता आंदोलन केल्याप्रकरणी कॉकरोच जनता पक्षाचा (सीजेपी)

स्वच्छ मुंबई सेवा अभियानाच्या प्रकल्पाला मंजुरी; SRA, MHADA च्या इमारतींमध्येही कचरा उचलला जाणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिके मार्फत सन 2013 पासून राबविण्यात येत असलेल्या "स्वच्छ मुंबई प्रबोधन