एशियन गेम्स 2026 च्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. जपानमधील निशिन येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्क येथे झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामन्यात 19 धावांनी जिंकून भारताने पाकिस्तानचा सुपडा साफ करत सुवर्णपदक जिंकले. या सामन्यातील वॉशिंग्टन सुंदरचा एक झेल रोमांचकारी ठरला. भारताने दिलेल्या 212 धावांचे लक्ष्य पूर्ण करत असताना पाकिस्तानच्या माझ सदाकतला वॉशिंग्टन सुंदरने बाद केले. सीमारेषेवरील त्याचा तो झेल सामन्याच्या क्षेत्ररक्षणापैकी सर्वोत्तम झेल ठरला.
अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर 18 चेंडूंवर 23 धावा करणारा माझ सदाकत सातव्या ओव्हरला बाद झाला. वॉशिंग्टनने घेतलेला तो झेल उत्कृष्ट आणि अचूक होता. अक्षरने राउंड द विकेट चेंडू टाकला होता. सदाकतने खाली बसून बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरून स्वीप शॉट मारला. वॉशिंग्टन खोल क्षेत्ररक्षणात डावीकडे धावला, त्याने झेल घेतला पण चेंडूच्या वेगामुळे तो सीमारेषेबाहेर जात होता, म्हणून त्याने चेंडू वर फेकला आणि झेल पूर्ण करण्यासाठी परत आत आला. सदाकतला बाद घोषित करण्यापूर्वी पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली. निर्णय अंतिम झाल्यानंतर पाकिस्तानचे 39 धावांवर आपले 3 गडी बाद झाले.
वॉशिंग्टन सुंदरचा हा झेल या सामन्यातील उत्कृष्ट झेल होताच पण त्याने या सामन्यात अजून चांगली कामगिरी केली. त्याने 22 चेंडूंमध्ये 29 धावा करणाऱ्या साईम अयुबला झेल घेत बाद केले. सुंदरचे हे दोन झेल भारताच्या आजच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरले. भारताचे क्षेत्ररक्षण अजूनही मजबूत असल्याचे वॉशिंग्टन सुंदरने दाखवून दिले.
एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली. या सामन्यात भारताने पाकिस्तान नमवत सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदकावर नाव कोरलं. या सामन्यात भारातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 211 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 212 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठताना पाकिस्तान संघाची पुरती वाट लागली. तसेच 192 धावांपर्यंत मजल मारू शकले. भारताने हा सामना 19 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने पाकिस्तान संघाची पुन्हा एकदा नांगी ठेचली असून आणखी एक विजयी आघाडी घेतली आहे. भारत आणि पाकिस्तान हे संघ 18व्यांदा टी20 क्रिकेटमध्ये आमनेसामने आले होते. या विजयासह भारताने पाकिस्तानवर आघाडी मिळवण्याची ही 15वी वेळ आहे. तर पाकिस्तानचा संघ आतापर्यंत फक्त तीन वेळाच विजय मिळवू शकला आहे.