पुण्यातील २२ वर्षीय तरुणी कॉलेजसाठी निघाली, पण परतलीच नाही... 'तो' ईमेल वाचून पालकांना बसला धक्का

पुण्यातील २२ वर्षांची तरुणी आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्सच्या शेवटच्या वर्षाला असलेली हवेली तालुक्यातील तरुणी नेहमीप्रमाणे कॉलेजसाठी घरातून बाहेर पडली. खाजगी कॉलेजमध्ये शिकत असलेली ही तरुणी आपल्या नेहमीच्या वेळी कॉलेजला गेली. परंतु रात्री उशीर झाला तरी मुलगी घरी परतली नसल्याने आई चिंतेने व्याकुळ झाली. घरच्यांनी सगळीकडे तिला शोधायला सुरुवात केली. ती कोणत्या नातेवाईकांकडे किंवा मित्र-मैत्रिणींकडे गेली आहे का हेदेखील घरच्यांनी तपासले. पण मुलगी कुठेच सापडली नाही.


ही शोधाशोध सुरु असताना घरच्यांना एक मेल आला. बेपत्ता मुलीने स्वतः हा मेल पाठवला होता. यात मुलीने आपलं एका मुलावर प्रेम असल्याचे नमूद केले. 'मी एका मुलासोबत पळून जातेय. माझं त्याच्यावर प्रेम आहे. त्याला एड्स आहे हे मला माहित आहे तरीदेखील मी त्याच्याशी लग्न करणार आहे.' असा संदेश तिने ईमेलमध्ये लिहिला. हा ईमेल बघून घरच्यांना पायाखालची जमीन सरकली. हा सर्व प्रकार पुण्यातील फुरसुंगी पोलीस हद्दीत घडला. आपल्याला आलेला ईमेल बघून तरुणीच्या आई आणि भाऊ बहिणीला धक्का बसला.



आपली मुलगी सुरक्षित आहे का? ती कोणासोबत आहे? तो मुलगा कोण आहे? ती कुठे आहे? अशा प्रश्नांनी तिचे आईवडील चिंतातुर झाले. काळजीपोटी तरुणीच्या वडिलांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फुरसुंगी पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस यासंदर्भात सध्या बेपत्ता तरुणीचा आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणाचा शोध घेत आहेत.


Comments
Add Comment

Maatrubhumi Movie: सलमान खानच्या मोस्ट अवेटेड 'मातृभूमी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट मोकळी; केंद्र सरकारकडून हिरवा कंदील

नवी दिल्ली: बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान लवकरच एका नव्या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 2020 साली

Bullet Train News : बुलेट ट्रेन प्रकल्पाची मोठी झेप : साबरमती नदीवर उभारला ४८० मीटर लांब अन् ३६ मीटर उंच भव्य पूल

अहमदाबाद : देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai Ahemdabad Bullet Train)  प्रकल्पाच्या कामाला वेगाने गती मिळत असून, या

Nagpur Water Cut: नागपूर शहरात मंगळवारी पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागांना बसणारा फटका? वाचा यादी

नागपूर: नागपूर शहरामध्ये काही परिसरांमध्ये येत्या आठवड्यात पाणी पुरवठा बंद असणार आहे. शहराला पाणी पुरवठा केल्या

आपण कॉकरोच नाही पँथर आहोत, कॉकरोचवाल्यांची मगरुरी चांगली नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

रिपब्लिकन पक्ष हा संघर्ष करणारा पक्ष आहे. सामाजिक न्यायाची लढाई लढणारा पक्ष आहे. आपण सत्तेत जरुर आहोत, पण अन्याय

'गर्जना मोर्चा नव्हे ही तर कोल्हेकुई' - ॲड. आशिष शेलारांचा विरोधकांवर हल्लाबोल

निवडणुकीत विजय मिळाला तर ईव्हीएम आणि निवडणूक आयोग योग्य, मात्र पराभव झाला की त्याच निवडणूक आयोगावर आणि

'महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा २०२६': शेतात राबणाऱ्या हातांना मिळाला 'शेतकरी' म्हणून कायदेशीर दर्जा

राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्रात महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. २