मुंबई : सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अनेक भागांत पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आता ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून राज्यातील हवामानात बदल जाणवू लागला आहे. बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली असून उष्ण, दमट आणि कोरडे वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनाही उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ( October Weather)
4 ऑक्टोबर रोजी कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांत हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही दिवस या भागात पावसापेक्षा कोरड्या हवामानाचा प्रभाव राहण्याची शक्यता असून कमाल तापमान 36 अंश, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक परिसरातही पावसाची शक्यता कमी आहे. या भागात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असून कमाल तापमान 32 अंश आणि किमान तापमान 19 अंश सेल्सिअस राहू शकते. ( October Heat)
मुंबई : बदलत्या हवामानाचा आंबा आणि काजू पिकांना बसणारा फटका कमी करण्यासाठी सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाची ...
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर आणि कोल्हापूर परिसरात आकाश निरभ्र किंवा अंशतः ढगाळ राहू शकते. मात्र वातावरणातील आर्द्रता वाढल्याने उष्णतेची जाणीव होण्याची शक्यता आहे. या भागात कमाल तापमान 32 अंश, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर परिसरात सध्या कोरडे आणि दमट वातावरण आहे. पावसाने उघडीप घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. येथे कमाल तापमान 34 अंश आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
एकूणच, 4 ऑक्टोबरला राज्यातील बहुतांश भागात उष्ण, दमट आणि कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी उकाड्यापासून बचावासाठी पुरेसे पाणी प्यावे आणि शेतकऱ्यांनी स्थानिक हवामानाचा अंदाज पाहून शेतीची कामे करावीत.





