Ramayana Movie Set On Fire: रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाच्या सेटवर आग, सुदैवाने जीवितहानी नाही...

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या 'रामायणा' चित्रपटाच्या सेटला सोमवारी दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडलेली नाही.

मुंबई: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या 'रामायणा' चित्रपटाच्या सेटला आग लागल्याची घटना घडली आहे. आज (05 ऑक्टोबर- सोमवार) दुपारी चित्रपटाच्या सेटला भीषण आग लागली होती. घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये ही आगीची घटना घडली आहे. आगीमुळे हवेत धुराचे लोट पसरले, ज्यामुळे फिल्म सिटीमध्ये घबराट पसरली होती. 'रामायणा' चित्रपटाचे चित्रीकरण आजसाठी थांबवण्यात आल्याची माहिती आहे. जरीही जीवितहानी झाली नसली तरीही सेटचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.






प्राथमिक माहितीनुसार, 'रामायणा' चित्रपटाच्या सेटवर शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीची घटना घडली तेव्हा, सेटवर कोण कोण कलाकार होते, याची माहिती मिळालेली नाही. परंतू या आगीच्या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाहीये. आगीची घटना घडताच प्रॉडक्शन टीमकडून सेट खाली करण्यात आला. आगीची घटना घडताच तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. नेमकं आगीच्या घटनेमध्ये निर्मात्यांचं किती कोटींचं नुकसान झाले आहे, ही माहिती समोर आलेली नाही.






नितेश तिवारी दिग्दर्शित, 'रामायणा' चित्रपट दोन भागामध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग 2026 च्या दिवाळीमध्ये रिलीज होणार आहे, तर चित्रपटाचा दुसरा भाग 2027 च्या दिवाळीमध्ये रिलीज होणार आहे. मल्टीस्टारर चित्रपटामध्ये अवघं बॉलिवूड अवतरलं आहे. 'रामायणा'वर आधारित चित्रपटासाठी चाहते कमालीचे आतुर आहेत. चित्रपटातील पहिलं गाणं गेल्या काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं होतं. शिवाय, चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा जुलै महिन्यामध्ये रिलीज झाला होता. कदाचित फायनल ट्रेलर सुद्धा रिलीज होण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप निर्मात्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतू चित्रपटाचा ट्रेलर रिलीज खूप दिवस झाले आहेत. चित्रपट रिलीज होण्याच्या आधी चित्रपटाचा फायनल ट्रेलर येण्याची शक्यता आहे.





Comments
Add Comment

Paro Film : ‘पारो: वधू गुलामगिरीची अज्ञात कहाणी’ चित्रपट लवकरच; वधू तस्करीचा विषय मांडणारा नवा सिनेमा

महिलांची वधू म्हणून खरेदी-विक्री आणि त्यातून होणारे शोषण या गंभीर सामाजिक समस्येवर भाष्य करणारा ‘पारो: वधू

शिक्षकांच्या संघर्षाची गोष्ट सांगणारा ‘कबीर सर का आखरी लेसन’ इफ्फीमध्ये झळकला

काळ बदलला, वर्ग बदलले, फळ्याची जागा स्मार्ट बोर्डने घेतली. पण या बदलत्या काळात अनेक पिढ्या घडवणारे शिक्षक मात्र

Fulwara Marathi Movie: 'फुलवरा'चा लावणीसाज! वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या नव्या लूकची चर्चा

Fulwara Marathi Movie: रवी जाधव दिग्दर्शित आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‘फुलवरा’ या चित्रपटाची उत्सुकता आता

Tu Aahes Na: इफ्फीच्या मंचावर मराठी चित्रपटाची भावुक झलक! ‘तू आहेस ना’ला प्रेक्षकांचा प्रतिसाद

Tu Aahes Na: गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) येथे लव फिल्म्स फिल्म्सची

ऑस्कर 2027 च्या शर्यतीत 2 भारतीय चित्रपट! 'गोंधळ' आणि 'अँग'ने मिळवली पात्रता

Oscars 2027 : भारतीय चित्रपट 'गोंधळ' आणि 'अंग' यांनी ऑस्कर 2027 च्या शर्यतीत प्रवेश केला आहे. 'गोंधळ'ला आंतरराष्ट्रीय फीचर

Dhadkan Sequel: 26 वर्षांनंतर 'धडकन 2' येणार? अक्षय-शिल्पाच्या जागी दिसणार नवी जोडी!

Dhadkan 2 : सध्या बॉलिवूडमध्ये अनेक गाजलेल्या चित्रपटांचे सिक्वेल आणि रिमेक बनवण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. 90 च्या