मेगास्टार अनिल कपूर यांना एशियन अकादमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्समध्ये 'सुभेदार' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार !

अनेक दशकांच्या विलक्षण कारकिर्दीनंतरही मेगास्टार अनिल कपूर हे त्यांच्या सिनेमॅटिक प्रवासात कायम चर्चेत असतात. आता आणखी एक मोठा टप्पा पार करत त्यांनी 'सुभेदार' या चित्रपटामधील त्यांच्या अभिनयासाठी Asian Academy Creative Awards मध्ये 2026 सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला आहे.


आपल्या प्रियजनांचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक भ्रष्टाचाराविरोधात उभा राहत नागरी जीवनाशी जुळवून घेणाऱ्या निवृत्त सैनिक सुभेदार अर्जुन मौर्याची कपूर यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षक आणि समीक्षक दोघांच्याही मनाला खोलवर भिडली आहे. या चित्रपटाने भारतासाठी Best Feature Film हा पुरस्कारही जिंकला आहे. Asian Academy Creative Awards ने सोशल मीडियावर या यशाचा गौरव केला असून त्यांनी एका पोस्टमध्ये लिहिले, "अभिनंदन, अनिल कपूर! 'Subedaar' मधील त्यांच्या उल्लेखनीय अभिनयामुळे त्यांना 2026 National Winner - Best Actor in a Leading Role हा पुरस्कार मिळाला आहे. 3 डिसेंबर रोजी होणाऱ्या Asian Academy Creative Awards Grand Gala Final मध्ये ते भारताचे प्रतिनिधित्व करतील !







भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक म्हणून मिळवलेल्या यशावर विसंबून न राहता ते सातत्यपूर्ण काम करत आहेत. या प्रवासाबद्दल बोलताना अनिल कपूर यांनी दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी, आपल्या सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले आणि हा सन्मान त्यांच्या कारकिर्दीत विशेष स्थान राखतो कारण हा चित्रपट बनवताना त्यांनी आणि संपूर्ण टीमने मनापासून घेतलेली मेहनत आणि जिद्द यात प्रतिबिंबित होते असे ते सांगतात.3 डिसेंबर रोजी हा सोहळा पार पडणार असून मेगास्टार अनिल कपूर जागतिक मंचावर अभिमानाने भारतीय ध्वज घेऊन उभे राहतील.


सुरेश त्रिवेणी यांनी दिग्दर्शन केलेला सुभेदार हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट अॅक्शनसोबतच वडील आणि मुलीची भावनिक कथादेखील मांडतो. या चित्रपटाला एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्समध्ये भारताचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, तर जॅकी चॅनच्या 'द शॅडो एज'ला चीनकडून हाच सन्मान मिळाला.

Comments
Add Comment

Jijai Movie : स्त्रीशक्तीचा धगधगता अवतार! रिंकू राजगुरूचा ‘जिजाई’ चित्रपटगृहांत दाखल

मुंबई :  घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना कुटुंबासाठी सतत धडपडणारी स्त्री स्वतःच्या सुरक्षिततेसाठी,

OM MOVIE REVIEW : 'पुष्पा'लाही मागे टाकणार ? धनुष-ममूटींचा 'OM: Operation Mole' चित्रपटगृहात दाखल; वाचा प्रेक्षकांचा पहिला रिव्ह्यू!

मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार धनुष, ममूटी आणि अभिनेत्री साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका

Bigg Boss 20 Extension: TRP चा धमाका! 'बिग बॉस 20' आणखी 2 ते 4आठवडे वाढणार?

Bigg Boss 20 Extension: सर्वाधिक चर्चेत असणारा रिॲलिटी शो ‘बिग बॉस 20’ बद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. 6 सप्टेंबर 2026 रोजी सुरू

Kriti Sanon Dating: लंडन, ग्रीस आणि आता वाढदिवसाची पोस्ट! क्रिती-कबीरच्या नात्याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता

Kriti Sanon Dating: बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सॅनॉन सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत

IFFI 2026 मध्ये मराठी सिनेमाचा डंका! 13 मराठी चित्रपट महोत्सवात झळकणार

गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडणार असून यंदाच्या

दोन वर्षांनंतर हर्षद अतकरी छोट्या पडद्यावर; 'येतेच आता मी नांदायला'मध्ये साकारणार अभिजीत थोरात

Yetach Ata Mi Nandayla: 'येतेच आता मी नांदायला' या झी मराठीच्या आगामी मालिकेतून अभिनेता हर्षद अतकरी जवळपास दोन वर्षांनंतर