मुंबई : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर 6 ऑक्टोबर 2026 रोजी होणारा प्रस्तावित संप मागे घेण्यात आला आहे. तसेच मुंबईतील आझाद मैदानावर काढण्यात येणारा मोर्चाही रद्द करण्यात येणार असल्याची माहिती आहे. (Anganwadi protest)
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 2 ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्याबाबत संघटनेने निवेदन दिले होते. त्यानंतर मंत्रालयात मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक लवकरच राज्यातील दुष्काळग्रस्त ...
या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. शासनाकडून मागण्यांबाबत चर्चा करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने 6 ऑक्टोबर रोजी पुकारलेला एकदिवसीय लाक्षणिक संप मागे घेण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर आझाद मैदानावर नियोजित असलेला मोर्चाही मागे घेण्यात येणार आहे.
या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन आणि संघटनेमध्ये झालेल्या चर्चेनंतर आंदोलनाचा मार्ग तूर्तास टळला आहे.
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून महिला व बालकांशी संबंधित विविध शासकीय योजना आणि उपक्रम राबवले जातात. त्यामुळे त्यांच्या मागण्यांबाबत झालेल्या चर्चेला महत्त्व आहे. आता शासनाकडून या मागण्यांवर पुढील काळात कोणती कार्यवाही केली जाते, याकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.